"छोटा पॅकेट बडा धमाका...!" या शेअरनं ५ वर्षांत १ लाखाचे केले १.४ कोटी, दिला १४८२५% परतावा; गुंतवणूकदार मालामाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2025 23:07 IST2025-02-23T22:59:10+5:302025-02-23T23:07:27+5:30
या स्टॉकचा ५२ आठवड्यांचा उच्चांक २२००.२० रुपये तर नीचांक २४१.५० रुपये एवढा आहे.

शेअर बाजार असे अनेक शेअर असतात जे आपल्या गुंतवणूकदारांना दीर्घ काळात मालामाल बनवतात. मात्र, काही शेअर असेही असतात, जे अगदी अल्पशा काळातच गुंतवणूकदारांना मालामाल करून जातात.
असाच एक शेअर म्हणजे,इंडो थाई सिक्युरिटीजचा (Indo Thai Securities Ltd). इंडो थाई सिक्युरिटीजच्या शेअरने केवळ ५ वर्षांतच आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना १४८२५% चा जबरदस्त परतावा दिला आहे.
अर्थात, जर कुणी ५ वर्षांपूर्वी या शेअरमध्ये १ लाख रुपये गुंतवले असते, तर आज ती रक्कम १.४९ कोटी रुपयांवर पोहोचली असती.
इंडो थाई सिक्युरिटीजचा शेअर गेल्या शुक्रवारी (२१ फेब्रुवारी २०२५) १,९८० रुपयांवर बंद झाला. मात्र, ५ वर्षांपूर्वी हा शेअर केवळ १३.४० रुपयांवर व्यवहार करत होता.
सध्या इंडो थाई सिक्युरिटीजचे मार्केट कॅप २,१९० कोटी रुपये आहे. या स्टॉकचा ५२ आठवड्यांचा उच्चांक २२००.२० रुपये तर नीचांक २४१.५० रुपये एवढा आहे.
गेल्या तीन महिन्यांत कंपनीने ८८.५७% परतावा दिला आहे. तर, गेल्या १ वर्षात कंपनीने ५००% एवढा बंपर परतावा दिला आहे.
(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)