याला म्हणतात 'पैसा ही पैसा'...! १ लाखाचे झाले १२ कोटी, फक्त ₹१५ च्या शेअरनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल; तुमच्याकडे आहे का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2025 00:34 IST2025-09-09T00:27:36+5:302025-09-09T00:34:02+5:30

आज आम्ही आपल्याला एका अशा शेअरसंदर्भात माहिती देत आहोत, ज्याने आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे, त्यांचे नशीबच बदलले आहे.

शेअर बाजारात असे अनेक शेअर आहेत, ज्यांनी आपल्या गुंतवणूकदारांन मालामाल केले आहे. याच बरोबर, असेही अनेक शेअर आहेत, ज्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना पार कंगाल केले आहे. सांगायचे एवढेच की, शेअर बाजारातील गुंतवणूक ही, धोकादायकही ठरू शकते. विशेषतः तेव्हा, जेव्हा जगात भू-राजकीय तणाव शिगेला असतो.

अशा परिस्थितीत, गुंतवणूकदाराने एखाद्या शेअरमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी, त्या शेअरसंदर्भात संपूर्ण माहिती मिळवायला हवी. आज आम्ही आपल्याला एका अशा शेअरसंदर्भात माहिती देत आहोत, ज्याने आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे, त्यांचे नशीबच बदलले आहे. हा शेअर आहे हिताची एनर्जी इंडियाचा (Hitachi Energy India shares). या शेअरने गेल्या काही वर्षांतच आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा दिला आहे.

गुंतवणूकदारांना केलं मालामाल - हिताची एनर्जी इंडियाच्या शेअरची किंमत २०२० मध्ये केवळ १५ रुपये एवढी होती. हा शेअर आता एनएसईवर १९,०३० रुपयांवर व्यवहार करत आहे. अर्था केवळ पाच वर्षांतच या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे.

जर एखाद्या गुंतवणूकदाराने पाच वर्षांपूर्वी या शेअरवर १ लाख रुपयांची गुंतवणूक केली असती, तर आज तिचे मूल्य १२.६० कोटी रुपये एवढे झाले असते. गेल्या पाच वर्षांत हा स्टॉक तब्बल १,२४,६०८.६१ टक्के एवढा वधारला आहे.

गेल्या सहा महिन्यांचा विचार करता, या शेअरने ४८.१० टक्के एवढा परतावा दिला आहे. गेल्या एका वर्षात हा शेअर ६४.६५ टक्के वधारला आहे. अर्थात, या शेअरने दीर्घ काळात आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. महत्वाचे म्हणजे, या स्टॉकने सातत्याने सकारात्मक परतावा दिला आहे.

सोमवारी व्यवहारादरम्यान हिताची एनर्जी इंडियाचा शेअर १८,८७५ वर स्थिर व्यवहार करत होता.

पहिल्या तिमाहीत कंपनीची कामगिरी - गेल्या 30 जून, 2025 रोजी संपलेल्या पहिल्या तिमाहीत हिताची एनर्जी इंडिया लिमिटेडचा नेट प्रॉफिट 131.6 कोटी रुपये होता. तर गेल्या वर्षाच्या याच तिमाहीत हा प्रॉफीट 10.42 कोटी रुपये होता.

तसेच, कंपनीचा ऑपरेशनल महसूल ११.४ टक्क्यांनी वाढून १,४७९ कोटी झाला आहे, जो गेल्या वर्षीच्या पहिल्या तिमाहीत १,३२७ कोटी होता. हे ऑपरेशनल कार्यक्षमता आणि वेळेवर ऑर्डर पूर्ण करण्यात आल्याने शक्य झाले.

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)