शेअर असावा तर असा! या मल्टीबॅगर स्टॉकनं दिला 7000% चा तुफान परतावा, 3 वर्षात ₹1 लाखाचे केले ₹2 कोटी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2024 10:58 PM2024-02-20T22:58:22+5:302024-02-20T23:04:56+5:30

. या कालावधीत जेनसोल इंजिनिअरिंगचा शेअर 18 रुपयांवरून 1300 रुपयांपर्यंत वधारला आहे.

जेनसोल इंजिनिअरिंगच्या शेअरमद्ये तुफान तेजी आली आहे. गेल्या 3 वर्षातच कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 7000% परतावा दिला आहे. या कालावधीत जेनसोल इंजिनिअरिंगचा शेअर 18 रुपयांवरून 1300 रुपयांपर्यंत वधारला आहे. कंपनीने केवळ 3 वर्षांत दोन वेळा बोनस शेअर्स दिले आहेत.

बोनस शेअर्सच्या बळावर, जेनसोल इंजिनिअरिंगच्या शेअर्सने अवघ्या 3 वर्षांतच 1 लाख रुपयांचे 2 कोटी रुपयांपेक्षाही अधिक केली आहेत. 20 फेब्रुवारी 2024 रोजी कंपनीचा शेअर 1331.10 रुपयांवर बंद झाला.

असे झाले 1 लाख रुपयांचे 2 कोटी - जेनसोल इंजिनिअरिंगचा शेअर 12 फेब्रुवारी 2021 रोजी 18.75 रुपयांवर होता. तेव्हा एखाद्या व्यक्तीने कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती, तर त्याला 5333 शेअर्स मिळाले असते.

कंपनीने ऑक्टोबर 2021 मध्ये 1:3 या रेशोमध्ये बोनस शेअर दिले आहेत. जेनसोल इंजिनिअरिंगने ऑक्टोबर 2023 मध्ये 2:1 रेशोमध्ये बोनस शेयर दिले.

हे बोनस शेअर एकत्र केल्यास एकूण शेअर्सची संख्या 21330 होते. कंपनीचा शेअर 20 फेब्रुवारी 2024 रोजी 1331.10 रुपयांवर बंद झाला. सध्याच्या शेअर प्राइसनुसार, या शेअर्सची व्हॅल्यू 2.83 कोटी रुपये एवढी आहे.

1 वर्षात 321% ने वधारला कंपनीचा शेअर - जेनसोल इंजिनिअरिंगचा शेअर गेल्या एका वर्षात 321 टक्क्यांनी वधारला आहे. या कालावधीत कंपनीचा शेअर 316.88 रुपयांवरून 1331.10 रुपयांवर पोहोचला आहे. तर, गेल्या 6 महिन्यांत जेनसोल इंजिनिअरिंगच्या शेअरने गुंतवणूकदारांचा पैसा दुप्पटहून अधिक केला आहे.

गेल्या सहा महिन्यांचा विचार करता, कंपनीचा शेअर 128 टक्क्यांनी वाढला आहे. गेल्या एका महिन्यात जेनसोल इंजिनिअरिंगच्या शेअरमध्ये 50 टक्क्यांची तेजी आली आहे. कंपनीच्या शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांक 1377.10 रुपये एवढा आहे. तर नीचांक 265.42 रुपये एवढा आहे.

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)