बम्पर परतावा! 20 पैशांच्या शेअरची कमाल, 2 वर्षांत गुंतवणूकदार मालामाल; ₹1 लाखचे झाले ₹3.46 कोटी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2023 07:33 PM2023-03-25T19:33:51+5:302023-03-25T19:51:47+5:30

आज आम्ही आपल्याला अशाच एका पेनी स्टॉकसंदर्भात माहिती देणार आहोत. ज्याने आपल्या गुंतवणूकदारांना अल्पावधीतच बम्पर परतावा दिला आहे.

शेअर बाजारात पैशांची गुंतवणूक करून कुणीही कोट्यधीश होऊ शकतं. पण, यासाठी दर्जेदार शेअर्सची निवड करणे आश्यक आहे. याच बरोबर आपल्यात धैर्यही असावे लागते. आज आम्ही आपल्याला अशाच एका पेनी स्टॉकसंदर्भात माहिती देणार आहोत. ज्याने आपल्या गुंतवणूकदारांना अल्पावधीतच बम्पर परतावा दिला आहे.

या पेनी स्टॉकटे नाव आहे, राज रेयॉन इंडस्ट्रीज (Raj Rayon Industries). राज रेयॉन इंडस्ट्रीजचे शेअर्स हे मल्टीबॅगर शेअर्सपैकी एक आहेत. या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना अल्पावधीत कोट्यधीश बनविले आहे.

वर्षभरातच दिला 4,100 टक्के परतावा - हा स्मॉल-कॅप पेनी स्टॉक गेल्या वर्षभरातच मल्टीबॅगर स्टॉक बनला आहे. कारण या कालावधीत हा स्टॉक ₹1.65 प्रति शेअरवरून थेट ₹69.20 वर पोहोचला आहे. अर्था, या शेअरने केवळ एका वर्षातच आपल्या गुंतवणूकदारांना सुमारे 4,100 टक्क्यांचा परतावा दिला आहे.

तसेच गेल्या दोन वर्षांचा विचार करता, हा मल्टीबॅगर पेनी स्टॉक ₹0.20 वरून थेट ₹69.20 प्रति शेअरवर पोहोचला आहे. यामुळे या शेअरमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना जवळपास 3,45,000 टक्क्यांचा परतावा मिळाला आहे.

राज रेयॉन इंडस्ट्रीजच्या शेअर प्राइसची हिस्ट्री - हा मल्टीबॅगर पेनी स्टॉक गेल्या एक महिन्यापासून बेस बिल्डिंग मोडवर आहे. या काळात हा शेअर जवळपास 10 टक्क्यांपर्यंत घसरला आहे. मल्टीबॅगर स्मॉल-कॅप स्टॉक गेल्या सहा महिन्यांत प्रति शेअर ₹16.20 वरून ₹69.20 पर्यंत पोहोचला. या काळात शेअरधारकांना जवळपास 325 टक्के परतावा मिळाला.

गेल्या एक वर्षाचा विचार करता, एका वर्षात हा मल्टीबॅगर स्टॉक ₹1.65 वरून ₹69.20 प्रति शेअरवर पोहोचला आहे. अर्थात या काळात गुंतवणूकदारांना 4 हजार 100 टक्के परतावा मिळाला आहे. याच पद्धतीने हा पेनी स्टॉक गेल्या दोन वर्षांत ₹0.20 वरून ₹69.20 वर पोहोचला. या काळात गुंतवणूकदारांना 3,45,000 टक्के एवढा परतावा मिळाला.

गुंतवणूकदार बनले कोट्यधीश - राज रेयॉन इंडस्ट्रीजच्या शेअर प्राइस हिस्ट्रीनुसार, जर एखाद्या गुंतवणूकदाराने या मल्टीबॅगर स्टॉकमध्ये एक महिन्यापूर्वी ₹1 लाख गुंतवले असते, तर या कालावधीत त्याच्या ₹1 लाखचे ₹90,000 झाले असते. तथापि, जर एखाद्या गुंतवणूकदाराने नवीन वर्ष 2023 च्या सुरुवातीला या मल्टीबॅगर पेनी स्टॉकमध्ये ₹ 1 लाख गुंतवले असते, तर त्याचे ₹1 लाख YTD कालावधीत ₹ 1.85 लाख झाले असते.

जर एखाद्या गुंतवणूकदाराने सहा महिन्यांपूर्वी या मल्टीबॅगर स्टॉकमध्ये ₹1 लाखांची गुंतवणूक केली असती, तर त्याचे ₹1 लाख आज ₹4.25 लाख झाले असते. याच पद्धतीने एखाद्या गुंतवणूकदाराने वर्षभरापूर्वी या पेनी स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते तर आज त्याच्या 1 लाख रुपयांचे 42 लाख झाले असते.

याच पद्धतीने, जर एखाद्या गुंतवणूकदाराने दोन वर्षांपूर्वी या मल्टीबॅगर स्टॉकमध्ये ₹1 लाखाची गुंतवणूक केली असती आणि ती आतापर्यंत कायम ठेवली असती, तर त्याच्या ₹1 लाखाचे आज ₹3.46 कोटी झाले असते.

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)