स्कूल ड्रॉपआऊट, ३५० अब्जांच्या कंपनीचे मालक; आहे जगातील सर्वात मोठं गोल्ड ज्वेलरी स्टोअर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2023 08:53 AM2023-10-20T08:53:54+5:302023-10-20T09:08:56+5:30

२०२३ साठी फोर्ब्सने जाहीर केलेल्या श्रीमंतांच्या यादीत ते भारतातील ५० वे सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहे.

२०२३ साठी फोर्ब्सने जाहीर केलेल्या श्रीमंतांच्या यादीत ते भारतातील ५० वे सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहे. तर यानुसार ते भारतातील सर्वात श्रीमंत ज्वेलर बनले आहेत. गेल्या वर्षी त्यांचं रँकिंग ६९ होतं.

जॉय अलुकास हा मल्टीनॅशनल ज्वेलरी ग्रुप आहे. जॉय अलुकस यांचे कुटुंब देखील दागिन्यांच्या व्यवसायात आहे. त्यांचे वडील वर्गीस अलुकस यांनी १९५६ मध्ये केरळमधील त्रिशूर येथे पहिले स्टोअर सुरू केले.

जॉय अलुकास हा मल्टीनॅशनल ज्वेलरी ग्रुप आहे. जॉय अलुकस यांचे कुटुंब देखील दागिन्यांच्या व्यवसायात आहे. त्यांचे वडील वर्गीस अलुकस यांनी १९५६ मध्ये केरळमधील त्रिशूर येथे पहिले स्टोअर सुरू केले.

तोच व्यवसाय पुढे नेण्याचं जॉय अलुकास यांनी ठरवलं. त्यांनी १९८७ मध्ये अबुधाबीमध्ये अलुकास ज्वेलरीचं पहिलं परदेशी स्टोअर उघडले. नंतर त्यांनी स्वतःच्या नावानं ज्वेलरी स्टोअर्स सुरू केली आणि अशा प्रकारे जॉय अलुक्स ज्वेलरीचा जन्म झाला.

आज कंपनीचे मूल्य ४.४ अब्ज डॉलर्स आहे. भारतीय चलनात पाहिल्यास ते ३६६ अब्ज डॉलर्स आहे. २०२२-२३ मध्ये भारतात या ब्रँडची एकूण उलाढाल १४५१२ कोटी रुपये होती. त्याचवेळी कंपनीचा नफा ८९९ कोटी रुपये होता.

आर्थिक वर्ष २०२४ मध्ये १७५०० कोटींचं उत्पन्न आणि ११०० कोटी रुपयांचं नफा नफा मिळवण्याचं उद्दिष्ट कंपनीनं ठेवलं आहे. कंपनीचे जगभरात १६० शोरूम आहेत. त्यापैकी १०० शोरूम भारतात आहेत.

पुढील काळात शोरूम्सची संख्या वाढवून १३० करण्याची कंपनीची योजना आहे. पुढील दोन आर्थिक वर्षांत हे काम करण्याचं त्यांनी ध्येय ठेवलं आहे. याशिवाय २४०० कोटी रुपये खर्चून परदेशात १० आऊटलेट्स सुरू करण्याचीही त्यांची योजना आहे. जगातील सर्वात मोठं गोल्ड आऊलटेलही जोय अलुकासचंच आहे. ते चेन्नई येथे आहे.

कंपनीच्या ११ देशांमध्ये असलेल्या १६० शोरूम्समध्ये ९००० पेक्षा अधिक कर्मचारी आहेत. याचे जगभरात १ कोटींपेक्षा अधिक ग्राहक आहे. कंपनीनं आजवर १० लाख एक्सक्लुसिव्ह डिझाईन्सही तयार केली आहेत. जॉय अलुकास यांचे आणखी तीन भाऊ आहेत. विभाजनात त्यांना युएईतील ३ शोरूम्स देण्यात आली होती. आता ते युएईलाच वास्तव्यास आहेत.