वाढत्या महागाईमध्येही मुलांच्या शिक्षणासाठी स्मार्ट प्लानिंग करा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2025 17:31 IST2025-03-01T17:17:18+5:302025-03-01T17:31:41+5:30
Savings Plans for Kids: आपल्या मुलांचे भविष्य उज्ज्वल असावं, असं प्रत्येक पालकालाच वाटतं असतं. कोणत्या गोष्टी पालकांनी करायला हव्यात?

पालक मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी कायम चिंतित असतात. मुलांच्या उच्च शिक्षणासाठी त्यांना विशेष विमा पॉलिसी घ्यावी लागते किंवा चाइल्ड एज्युकेशन प्लान निवडता येतो.
विम्याच्या प्रीमियम दरमहा, सहा महिन्यांनी, वार्षिक स्वरूपात किंवा एकरकमी करता येते. त्यानंतर मॅच्युरिटी बेनिफिट मिळतो जो शिक्षणाच्या खर्चासाठी वापरला जाऊ शकतो.
लाइफ इन्शुरन्स कव्हरेजमुळे जीवन विमा संरक्षण मिळते. माता-पित्यांपैकी कोणाचाही आकस्मिक मृत्यू झाल्यास मुलांना लाभ मिळवून दिला जातो.
मॅच्युरिटीनंतर मुलाला वयाच्या आधारे पेमेंट एकरकमी किंवा ठराविक कालावधीनंतर दिले जाते. चाइल्ड एजुकेशन प्लानमुळे मुलांच्या गरजांसाठी तजवीज करता येते.
आपत्कालीन स्थितीत त्वरित आर्थिक मदत मिळते व गुंतवणुकीवर हमखास परतावा मिळतो. याच्या मदतीने एज्युकेशन लोन मिळवणे सोपे होते.
चाइल्ड युलीप या प्रकारात पॉलिसी टर्मच्या मुदतीनंतर एकरकमी रक्कम मिळते. याचा लाभ मुलाच्या १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर मिळतो. पालकाच्या मृत्यूच्या स्थितीत सम अॅश्युअर्डची संपूर्ण रक्कम दिली जाते.
एंडोमेंट प्लानमध्ये सम अॅश्युअर्डसोबत बोनसच्या रूपात हमखास परतावा मिळतो, जीवन विमा संरक्षणही मिळते. इन्शुरन्समध्ये नियमित अंतराने निश्चित परतावा मिळतो.