पेन्शन, टॅक्स पासून एलपीजी पर्यंत; १ डिसेंबरपासून बदलणार हे महत्त्वाचे नियम, तुमच्यावर थेट होणार परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2025 09:23 IST2025-11-26T09:16:32+5:302025-11-26T09:23:06+5:30

नोव्हेंबर महिना आता संपत आला आहे आणि त्यासोबतच अनेक सरकारी कामांसाठी आणि आर्थिक बाबींसाठी अंतिम मुदती जवळ येत आहेत. जर तुम्ही ही महत्त्वाची कामं अद्याप पूर्ण केली नसतील, तर ती ३० नोव्हेंबरपर्यंत कोणत्याही परिस्थितीत ती पूर्ण करा.

नोव्हेंबर महिना आता संपत आला आहे आणि त्यासोबतच अनेक सरकारी कामांसाठी आणि आर्थिक बाबींसाठी अंतिम मुदती जवळ येत आहेत. जर तुम्ही ही महत्त्वाची कामं अद्याप पूर्ण केली नसतील, तर ती ३० नोव्हेंबरपर्यंत कोणत्याही परिस्थितीत ती पूर्ण करा, कारण त्यानंतर तुम्हाला ती करण्याची संधी मिळणार नाही. १ डिसेंबरपासून बऱ्याच गोष्टी बदलतील. त्यांच्याबद्दल येथे अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न करू.

UPS पेन्शन स्कीम - सरकारी कर्मचाऱ्यांना युनिफाइड पेन्शन स्कीम निवडण्याची अंतिम तारीख ३० नोव्हेंबर निश्चित करण्यात आली आहे. ही तारीख मूळतः ३० सप्टेंबर होती, परंतु नंतर ती वाढवण्यात आली. UPS हे NPS पेक्षा वेगळे मॉडेल आहे आणि हा पर्याय मर्यादित काळासाठी उपलब्ध आहे. ज्या कर्मचाऱ्यांना हा पर्याय निवडायचा आहे त्यांनी ३० नोव्हेंबरपूर्वी अर्ज करावा. हा पर्याय १ डिसेंबरपासून उपलब्ध राहणार नाही.

लाईफ सर्टिफिकेट - पेन्शनधारकांना दरवर्षी जीवन प्रमाणपत्र सादर करणं आवश्यक आहे. या वर्षी, जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची अंतिम तारीख ३० नोव्हेंबर आहे. १ डिसेंबरपासून तुम्हाला पुन्हा ही संधी मिळणार नाही. वेळेवर जीवन प्रमाणपत्र सादर न केल्यास पेन्शन थांबू शकते. डिजिटल जीवन प्रमाणपत्र घरबसल्या मिळू शकतं.

टॅक्सशी निगडीत कामं - जर ऑक्टोबर २०२५ मध्ये टीडीएस कापला गेला असेल, तर कलम १९४-आयए, १९४-आयबी, १९४एम आणि १९४एस अंतर्गत विवरणपत्रं सादर करणं अनिवार्य आहे. यासाठी अंतिम तारीख ३० नोव्हेंबर आहे. कलम ९२ई अंतर्गत अहवाल सादर करणं आवश्यक असलेले करदातेदेखील ३० नोव्हेंबरपर्यंत त्यांचे आयटीआर दाखल करू शकतात. आंतरराष्ट्रीय गटांच्या घटक घटकांसाठी फॉर्म ३सीईएए सादर करण्याची ही अंतिम तारीख आहे. १ डिसेंबरपासून, तुम्ही हे करू शकणार नाही.

एलपीजीची किंमत - इंधन कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या दिवशी एलपीजीच्या किमती सुधारित करतात. एलपीजी सिलिंडरच्या किमती देखील १ डिसेंबर रोजी अपडेट केल्या जातील. १ नोव्हेंबर २०२५ रोजी, OMCs नं १९ किलोग्रॅमच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत ₹६.५० पर्यंत कमी केली होती.

एटीएफ - एलपीजी प्रमाणे, इंधन कंपन्या देखील एटीएफच्या (एव्हिएशन टर्बाइन फ्युएल) किमती बदलू शकतात. एटीएफच्या किमती देखील दर महिन्याच्या पहिल्या दिवशी सुधारित केल्या जातात. त्यामुळे, १ डिसेंबर रोजी एटीएफच्या किमती वाढू किंवा कमी होऊ शकतात.