Ruchi Soya FPO Price: पतंजली मालामाल करणार! रामदेव बाबांच्या रुची सोयाच्या शेअर्सवर ३५ टक्के डिस्काऊंट; कमाईची संधी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2022 09:23 AM2022-03-21T09:23:35+5:302022-03-21T09:28:35+5:30

Ruchi Soya Shares Price: कंपनीने आपल्या फॉलो ऑन पब्लिक ऑफर (FPO) च्या प्राईज बँडची रविवारी घोषणा केली आहे. कंपनीचा 4,300 कोटी रुपयांचा एफपीओ 24 मार्च ला उघडणार आहे.

खाद्य तेलाच्या क्षेत्रातील प्रमुख कंपनी रुची सोया इंडस्ट्रीज (Ruchi Soya Industries) पैसे कमविण्याची संधी दिली आहे. कंपनीने आपल्या फॉलो ऑन पब्लिक ऑफर (FPO) च्या प्राईज बँडची रविवारी घोषणा केली आहे. कंपनीचा 4,300 कोटी रुपयांचा एफपीओ 24 मार्च ला उघडणार आहे. तसेच याला सबस्क्राईब करण्याची अखेरची तारीख 28 मार्च असेल.

रुची सोया इंडस्ट्रीजने एफपीओसाठी 615-650 रुपये प्रति शेअर किंमत निश्चित केली आहे. कंपनीने स्टॉक फाइलिंगमध्ये म्हटले आहे की कंपनीच्या इश्यू कमिटीने एफपीओसाठी प्रति शेअर 615 रुपये किंमत आणि 650 रुपये प्रति शेअर कॅप किंमत मंजूर केली आहे.

कंपनीने सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये म्हटले आहे की, FPO कमीतकमी शेअर संख्या ही 21 शेअर्सची आहे. म्हणजेच यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला कमीतकमी 21 समभाग विकत घ्यावे लागणार आहेत. तसाच अर्ज करावा लागणार आहे.

गुरुवारी जेव्हा शेअर बाजार बंद झाला तेव्हा बीएसईवर रुची सोयाच्या समभागाचे मूल्य 1,004.45 रुपये होते. म्हणजेच गुरुवारच्या तुलनेत कंपनीने 35 टक्क्यांनी कमी किंमत लावली आहे. एवढ्या मोठ्या डिस्काऊंटने हे शेअर्स विकले जाणार आहेत.

FPO अंतर्गत शेअर्सचे वाटप 4 एप्रिल 2022 रोजी केले जाईल. कंपनीचे शेअर्स 5 एप्रिल 2022 रोजी पात्र गुंतवणूकदारांच्या डिमॅट खात्यात जमा केले जातील आणि दुसऱ्या दिवसापासून ट्रेडिंग सुरू होईल.

ज्या गुंतवणूकदारांना एफपीओमध्ये यश मिळणार नाही, त्यांना 4 एप्रिलपासून परतावा मिळण्यास सुरुवात होईल. यामुळे जर शेअर मिळाले तर पुढील पंधरा दिवसांत एवढ्या खाली कंपनीचा शेअर येणार नाही. यामुळे गुंतवणूकदारांचा फायदा होण्याची शक्यता आहे.

योगगुरू बाबा रामदेव यांच्या नेतृत्वाखालील पतंजली आयुर्वेदने 2019 मध्ये दिवाळखोरी प्रक्रियेद्वारे रुची सोया विकत घेतली होती. कंपनीला गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये एफपीओ आणण्यासाठी बाजार नियामक सेबीची परवानगी मिळाली होती.