1 / 7Reliance Jio - रिलायन्स जिओ आपल्या ग्राहकांना अनेक प्रीपेड प्लॅन्स ऑफर करते. परंतु काही प्रीपेड पॅक आहेत ज्यांची किंमत जवळपास सारखीच आहे. असे प्लॅन्स ग्राहकांना गोंधळात टाकतात आणि कोणता प्लॅन आपल्यासाठी चांगला ठरू शकेल हे पाहणं थोडं अवघड होतं.2 / 7जिओचे 583 रुपये आणि 553 रुपयांचे दोन प्लॅन्स हे सारखेच आहेत. त्यांच्या किंमतीतील फरक खूपच कमी आहे. म्हणून यातील कोणता प्लॅन चांगला याची तुलना आपण करून पाहणार आहोत.3 / 7583 रुपयांच्या या प्रीपेड पॅकमध्ये ग्राहकांना दररोज 1.5GB डेटा मिळतो. हा प्लान 56 दिवसांच्या वैधतेसह येतो. याचाच अर्थ ग्राहकांना यात एकूण 84GB डेटा मिळेल. याशिवाय अमर्यादित व्हॉईस कॉल बेनिफिटसह, दररोज 100 एसएमएस देखील देण्यात येतात. 4 / 7याशिनाय कंपनी ग्राहकांना JioTV आणि JioCinema अॅप्सचाही मोफत सबस्क्रिप्शन देते. Jio तीन महिन्यांसाठी मोफत Disney+ Hotstar मोबाईल सबस्क्रिप्शन देखील देत आहे, ज्याची किंमत 149 रुपये आहे.5 / 7दुसरीकडे, Rs 533 प्रीपेड Jio प्लॅन जवळजवळ समान फायदे ऑफर करतो आणि फरक किरकोळ आहे. या प्लॅनसोबत ग्राहकांना दररोज 2GB डेटा, कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित व्हॉइस कॉल आणि दररोज 100 SMS मिळतात. हे 56 दिवसांच्या वैधता कालावधीसह देखील येते. या प्लॅन्ससहदेखील ग्राहकांना जिओ अॅप्सचं सबस्क्रिप्शन मिळतं.6 / 7583 रुपयांचा प्रीपेड प्लॅन OTT बेनिफिट्स देतो. परंतु यात तुम्हाला कमी डेटा मिळतो. यात 1.5GB दैनिक डेटा ऑफर केला जातो, तर 533 रुपयांचा प्रीपेड Jio प्लॅन 2GB दैनिक डेटा ऑफर करतो. दोन्ही एकाच वैधतेसह येतात. याशिवाय यातील बाकीचे फायदे समान आहेत. दोन्ही प्रीपेड प्लॅनमध्ये अमर्यादित व्हॉईस कॉल आणि 100 एसएमएस फायदे समाविष्ट आहेत.7 / 7जर तुम्हाला कमी खर्च करायचा असेल आणि जास्त डेटा हवा असेल, तर 533 रुपयांचा Jio प्रीपेड पॅक फायद्याचा ठरेल. जर तुम्हाला अधिक खर्च करणे परवडत असेल आणि तुम्हाला Disney+ Hotstar चं सबस्क्रिप्शन घ्यायचे असेल, तर तुम्ही 583 रुपयांचा प्रीपेड प्लॅन खरेदी करण्याचा विचार करू शकता.