1 / 7चित्रपट आणि टीव्ही शो पाहण्यासाठी OTT प्लॅटफॉर्मची मागणी सातत्याने वाढत आहे. अशा परिस्थितीत, अनेक दूरसंचार कंपन्यांच्या प्रीपेड प्लॅन्समध्ये वेगवेगळ्या OTT प्लॅटफॉर्मचं सबस्क्रिप्शन विनामूल्य दिलं जातं. 2 / 7जर तुम्ही रिलायन्स जिओचे (Reliance Jio) यूजर असाल आणि असाच प्लॅन शोधत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. येथे आम्ही तुम्हाला Reliance Jio च्या १ वर्षाच्या वैधतेसह आणि Disney + Hotstar च्या प्लॅन्सबद्दल सांगत आहोत.3 / 72999 रुपयांचा हा कंपनीचा लोकप्रिय प्रीपेड प्लॅन आहे, ज्याची वैधता एका वर्षाची आहे. यामध्ये तुम्हाला 365 दिवसांसाठी दररोज 2.5 जीबी डेटा दिला जातो. अशा प्रकारे तुम्हाला एकूण 912.5 GB डेटा मिळेल. 4 / 7यामध्ये ग्राहकांना अमर्यादित व्हॉइस कॉलिंग आणि दररोज 100 मेसेजेसची सुविधा देण्यात येते. खास गोष्ट म्हणजे तुम्हाला डिस्ने प्लस हॉटस्टारची प्लॅनमध्ये 1 वर्षासाठी सबस्क्रिप्शन दिलं जातं. याशिवाय तुम्हाला Jio अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन देखील मिळते.5 / 74199 रुपयांचा दुसरा प्लान देखील 1 वर्षाच्या वैधतेसह येतो. परंतु तुम्हाला त्यात अधिक डेटा मिळतो. या प्लॅन 365 दिवसांसाठी 3GB डेटा, अमर्यादित व्हॉईस कॉलिंग आणि दररोज 100 SMS दिले जातात. तुम्हाला प्लॅनमध्ये 1 वर्षासाठी डिस्ने प्लस हॉटस्टारचं सबस्क्रिप्शनही मिळतं. याशिवाय तुम्हाला Jio अॅप्सचे मोफत सबस्क्रिप्शन देखील मिळते.6 / 7जर तुम्हाला थोडा स्वस्त प्लॅन हवा असेल तर 1066 रुपयांचा Jio प्लॅन हा एक चांगला पर्याय असू शकतो. परंतु यामध्ये तुम्हाला फक्त 28 दिवसांची वैधता मिळते. दरम्यान यात तुम्हाला दररोज 2GB डेटा आणि 5GB अतिरिक्त डेटा दिला जातो. 7 / 7उर्वरित प्लॅन्सप्रमाणे यातही डिस्ने प्लस हॉटस्टारचं एका वर्षाचं सबस्क्रिप्शन, अमर्यादित व्हॉइस कॉलिंग आणि 100 एसएमएससही दिले जातात. याशिवाय जिओ अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शनही देण्यात येतं.