Reliance Jio चा धमाका! दररोज 2.5GB डेटा देणारे दोन नवे प्लॅन लाँच, वर्षभर रिचार्जचं नो टेन्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2022 02:53 PM2022-03-18T14:53:01+5:302022-03-18T15:04:22+5:30

रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांसाठी दोन नवे प्लॅन्स लाँच केले आहेत. पाहा काय मिळतंय यात.

कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर लोकांची कामाची पद्धतही बदलली आहे. अनेक कर्मचारी वर्क फ्रॉम होम करत आहेत, तर काही ठिकाणी हायब्रिड वर्क कल्चर लागू करण्यात आलंय. त्यामुळे आपल्याला घरून काम करताना चांगलं इंटरनेट असणं आवश्यक आहे.

रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांसाठी दोन नवे प्लॅन्स लाँच केले आहेत. वर्क फ्रॉम होम (Work From Home Data Packs) या कॅटेगरीत कंपनीनं हे दोन प्लॅन्स लाँच केले आहेत. या प्लॅन्सची किंमत 2878 रुपये आणि 2998 रुपये इतकी आहे.

विशेष म्हणजे यामध्ये तुम्हाला वर्षभरासाठी 2 GB आणि 2.5 GB डेटा मिळणार आहे. दोन्ही योजना कंपनीच्या वेबसाइटवर अपडेट करण्यात आल्या आहेत. पाहूया यामध्ये आणखी कोणते बेनिफिट्स देण्यात येत आहेत.

रिलायन्स जिओचा 2878 रुपयांचा प्रीपेड प्लॅन ग्राहकांना 365 दिवसांसाठी म्हणजेच वर्षभरासाठी दररोज 2GB डेटा ऑफर करतो. म्हणजेच या प्लानमध्ये तुम्हाला एकूण 730GB डेटा मिळेल.

एकदा डेटा मर्यादा संपली की, स्पीड 64Kbps पर्यंत कमी करण्यात येतो. हा वर्क फ्रॉम होम डेटा प्लान असल्याने यात व्हॉईस कॉलिंग आणि एसएमएससारखे फायदे देण्यात येत नाहीत.

जिओच्या नवीन 2998 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनसह ग्राहकांना 365 दिवसांसाठी दररोज 2.5GB डेटा दिला जाईल. म्हणजेच एका वर्षात तुम्हाला एकूण 912.5GB डेटा मिळेल.

एकदा डेटा मर्यादा संपली की, स्पीड 64Kbps पर्यंत कमी केला जाईल. हा वर्क फ्रॉम होम डेटा प्लान असल्याने, यात व्हॉईस कॉलिंग आणि एसएमएससारखे फायदे मिळणार नाहीत.

कंपनीकडे 181 रुपये, 241 रुपये आणि 301 रुपयांचे आणखी 3 वर्क फ्रॉम होम प्लॅन आहेत. हे तिन्ही प्लॅन 30 दिवसांच्या वैधतेसह येतात. 181 रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना 30 जीबी, 241 रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना 40 जीबी आणि 301 रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना 50 जीबी डेटा दिला जातो.