२२२ रूपयांनी स्वस्त, तरीही मिळतोय तेवढाचा डेटा आणि ८४ दिवसांची व्हॅलिडिटी; पाहा Jio चा जबरदस्त प्लॅन

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2021 07:53 PM2021-03-19T19:53:00+5:302021-03-19T19:55:53+5:30

Reliance Jio : पाहा कोणते आहेत हे प्लॅन आणि काय आहे यात फरक

जर तुम्ही रिलायन्स जिओ वापरत असाल आणि ८४ दिवसांची व्हॅलिडिटी असलेला प्लॅन पाहत असाल तर तुमची नजर नक्कीच ५५५ रूपये आणि ७७७ रूपयांच्या प्लॅनवर गेली असेल.

या प्लॅनमध्ये मिळणारा डेटा आणि व्हॅलिडिटी तितकीच आहे. तर पाहूया या दोन प्लॅन्समध्ये नक्की काय आहे फरक.

रिलायन्स जिओच्या ५५५ रूपयांच्या प्लॅनमध्ये ८४ दिवसांची व्हॅलिडिटी आणि दररोज १.५ जीबी डेटा देण्यात येतो. यानुसार ग्राहकांना एकूण १२६ जीबी डेटा मिळतो.

याशिवाय या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग, दररोज १०० एसएमएस आणि जिओ अॅप्सचं मोफत सबस्क्रिप्शनही देण्यात येतं.

दरम्यान, ५५५ रूपयांच्या प्लॅनप्रमाणेच ७७७ रूपयांच्या प्लॅनमध्येही ८४ दिवसांसाठी दररोज १.५ जीबी डेटा देण्यात येतो. याशिवाय कंपनी ५ जीबी अतिरिक्त डेटाही देत आहे.

या प्लॅनमध्ये युझर्सना १३१ जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंगसह दररोज १०० एसएमएसही दिले जातात.

या प्लॅनमधील एक विशेष बाब म्हणजे या प्लॅनसोबत ग्राहकांना एका वर्षासाठी Disney + Hotstar प्लसचंदेखील सबस्क्रिप्शन देण्यात येतं.

पाहायला गेलं तर या प्लॅनची व्हॅलिडिटी आणि यासोबत मिळणारा डेटा जवळपास सारखाच आहे.

याशिवाय दोन्ही प्लॅन्समध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि एसएमएसची सुविधाही सारखीच मिळते.

या प्लॅनमध्ये सर्वात मोठा फरक म्हणजे Disney + Hotstar च्या सबस्क्रिप्शनचा आहे. जर तुम्हाला ही मेम्बरशीप इतकी महत्त्वाची नसेल तर तुम्ही ५५५ रूपयांचा प्लॅनही घेऊ शकता.