Shoaib Malik शी घटस्फोटानंतर Sania Mirza ने बदलली घरावरील 'नेम प्लेट'; स्वत:सोबत जोडले एका खास व्यक्तिचे नाव

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2024 11:06 AM2024-05-23T11:06:53+5:302024-05-23T11:08:02+5:30

Sania Mirza House Name Plate: सानियाला तलाक दिल्यावर शोएबने लगेच तिसरे लग्न केले, पण सानियाने मात्र आपल्या वैयक्तिक आयुष्याबाबत फारसे भाष्य केले नव्हते.

Sania Mirza changes her house name plate adds special person on it after divorce with Pakistan cricketer Shoaib malik | Shoaib Malik शी घटस्फोटानंतर Sania Mirza ने बदलली घरावरील 'नेम प्लेट'; स्वत:सोबत जोडले एका खास व्यक्तिचे नाव

Shoaib Malik शी घटस्फोटानंतर Sania Mirza ने बदलली घरावरील 'नेम प्लेट'; स्वत:सोबत जोडले एका खास व्यक्तिचे नाव

Sania Mirza House Name Plate: भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झा आणि पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक ( Pakistan cricketer Shoaib malik ) यांच्या घटस्फोटाची भरपूर चर्चा झाली. लग्नानंतर १२ वर्षांनी सानिया-शोएब वेगळे झाले. यानंतर शोएब मलिकनेपाकिस्तानी अभिनेत्रीशी तिसरे लग्न देखील केले. परंतु सानिया मिर्झाने तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत फारसे बोलणे टाळले होते. आता मात्र सानियाने आपल्या इंस्टाग्रामवर काही फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंमधील एका गोष्टीकडे साऱ्यांचेच लक्ष वेधले गेले आहे. सानिया मिर्झाने आपल्या घरावरील नेमप्लेट बदलली असून त्यात स्वतःबरोबर एका खास व्यक्तीचे नाव जोडले आहे.

सानिया मिर्झा आणि शोएब चा घटस्फोट झाला, तेव्हा अनेक चाहत्यांना धक्का बसला. त्यानंतर काही दिवसातच शोएब मलिकने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेद हिच्याशी तिसरी लग्न केले. ही गोष्ट देखील सानियाच्या चाहत्यांसाठी अधिक धक्कादायक होती. पण यानंतर सानियाची बहीण अनम मिर्झा हिने दिलेल्या माहितीनुसार, शोएब आणि सानिया बरेच आधीपासून वेगळे झाले होते. त्यांनी खुल्ला केला असल्याचे तिने सांगितले होते. त्यानंतर आता सानियाने आपल्या वैयक्तिक आयुष्यबाबत एक महत्त्वपूर्ण पोस्ट इन्स्टाग्राम वर शेअर केली आहे. यात तिने स्वतःच्या घराच्या नेमप्लेट वरील शोएब चे नाव काढून टाकून आता त्या जागी सानिया आणि तिचा मुलगा इजहान यांचे नाव लिहिले आहे. तसेच साने आणि तिच्या माहेरच्या लोकांबरोबर काही पोस्ट शेअर केल्या आहेत.

सानिया ने पोस्ट केलेल्या फोटोंमध्ये एकूण दहा फोटोंचा समावेश आहे त्यात तिने आपले कुटुंबीय आणि मित्र-मैत्रिणींबरोबर काही आनंदाचे क्षण घालवतानाचे फोटो टाकले आहेत.

दरम्यान, सानिया आणि शोएब यांचे लग्न एप्रिल 2010 मध्ये झाले होते. शोएबने आपली पहिली पत्नी आयशा सिद्धीकी हिला तलाक देऊन सानिया बरोबर दुसरे लग्न केले होते. या दोघांचा संसार सुमारे बारा वर्षांचा होता. त्यानंतर शोएबने सानियाला तलाक देऊन सना जावेद हिच्याशी लग्न केले. याच दरम्यान शोएबचे नाव इतरही काही अभिनेत्री आणि मॉडेलसोबत जोडण्यात आले होते.

Web Title: Sania Mirza changes her house name plate adds special person on it after divorce with Pakistan cricketer Shoaib malik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.