शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

२० रूपये कमी देऊनही मिळतेय २८ दिवसांऐवजी ८४ दिवसांची व्हॅलिडिटी; पाहा Reliance Jio चे जबरदस्त प्लॅन

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2021 4:38 PM

1 / 10
रिलायन्स जिओनं आपल्या युझर्ससाठी अनेक उत्तम प्लॅन्स लाँच केले आहेत. अनेक प्लॅन्समध्ये आपल्याला अतिरिक्त डेटाही देण्यात येत आहे.
2 / 10
काही प्लॅन्समध्ये कमी किंमतीत अधिक व्हॅलिडिटी आणि ठराविक डेटाही देण्यात येत आहे. आज आपण जिओच्या दोन प्लॅन्सची तुलना करणार आहोत. यामध्ये ३२९ रूपये आणि ३४९ रूपयांचे प्लॅन्स आहेत.
3 / 10
जर तुम्हाला डेटाची गरज अधिक नसेल तर तुम्ही ३२९ रूपयांचा प्लॅन घेऊ शकता. या प्लॅनमध्ये ३४९ रूपयांच्या तुलनेत ३ पट अधिक व्हॅलिडिटी मिळते.
4 / 10
परंतु यामध्ये युझरला ठराविक डेटा दिला जातो. या दोन्ही प्लॅन्समध्ये मिळणारे बेनिफिट्स हे निराळे आहेत.
5 / 10
रिलायन्स जिओच्या ३४९ रूपयांच्या प्लॅनची व्हॅलिडिटी २८ दिवसांची आहे. यामध्ये दररोज युझर्सना ३ जीबी डेटा देण्यात येत आहे. या प्लॅनमध्ये एकूण ८४ जीबी डेटा देण्यात येतो.
6 / 10
या प्लॅनमध्ये कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगचा फायदा मिळतो. याशिवाय या प्लॅनसोबत दररोज १०० एसएमएस देण्यात येतात. याव्यतिरिक्त या प्लॅनसोबत जिओ अॅप्सचं कॉम्लिमेंट्री सबस्क्रिप्शन देण्यात येतं. जिओच्या वेबसाईटमध्ये ३४९ रूपयांचा प्लॅन ट्रेंडिंगमध्ये सामील आहे.
7 / 10
जिओच्या ३२९ चा प्लॅन त्या युझर्ससाठी चांगला आहे ज्यांची डेटाची गरज अधिक नाही. हा प्लॅनमध्ये काही ठराविक डेटा देण्यात येतो.
8 / 10
या प्लॅनमध्ये एकूण ८४ दिवसांची व्हॅलिडिटी देण्यात येते. म्हणजेच ३४९ रूपयांच्या प्लॅनच्या तुनेत या प्लॅनमध्ये तिप्पट व्हॅलिडिटी मिळते.
9 / 10
३२९ रूपयांच्या प्लॅनमध्ये टोटल ६ जीबी डेटा देण्यात येतो. या प्लॅनसोबतही सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा देण्यात येते.
10 / 10
या प्लॅनमध्ये एकूण १ हजार एसएमएस पाठवण्याची सुविधाही मिळते. तसंच जिओ अॅप्सचं कॉम्पिमेंट्री सबस्क्रिप्शनही देण्यात येतं.
टॅग्स :Reliance Jioरिलायन्स जिओInternetइंटरनेटSmartphoneस्मार्टफोन