शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
2
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
3
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
4
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
5
दृष्टीहीन तरुणीने पंतप्रधानांचा हात पकडला; SPG कमांडो आला तेवढ्यात...पाहा मोदींनी काय केले
6
Baramati Lok Sabha : 'मटण, दारु, मताला हजार रुपये वाटले...' सुनिल शेळकेंचे आमदार रोहित पवारांवर गंभीर आरोप
7
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट
8
उत्तर प्रदेशमध्ये इंडिया आघाडीसाठी राहुल गांधींनी घेतला मोठा निर्णय; भाजपाच्या अडचणी वाढणार?
9
'माझ्याविरोधात कुणी तक्रार दिली तर...'; शिवीगाळ केल्याच्या व्हिडीओवरुन दत्ता भरणेंचा इशारा
10
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
11
"मी नाही तर कोण?" अमिताभ बच्चन यांच्याशी तुलना केल्यानंतर ट्रोल झालेली कंगना पुन्हा बरळली
12
लखनौ-गुवाहाटी-वाराणसी! KKR चं विमानाची दोन वेळा दिशा बदलली, खेळाडूंनी घेतलं काशी दर्शन अन् 
13
Maruti Baleno, जिम्नीसह पाच कारवर 1.50 लाखांपर्यंत कॅश डिस्काउंट, पाहा ऑफर्स...
14
गुड न्यूज! कोरोना व्हायरसच्या प्रत्येक व्हेरिएंटवर प्रभावी ऑल-इन-वन लस बनवताहेत शास्त्रज्ञ
15
दीपिका पदुकोण रणवीर सिंहसोबत एन्जॉय करतेय Babymoon, पहिल्यांदाच दिसला बेबीबंप
16
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
17
काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या राधिका खेडा, अभिनेता शेखर सुमन यांचा भाजपत प्रवेश
18
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
19
Gold Silver Price: अक्षय्य तृतीयेपूर्वी घसरले सोन्याचे दर; आज 'इतकं' स्वस्त झालं १० ग्राम Gold 
20
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!

मतदान कर्मचारी केंद्र बंद करून पंगतीत जेवायला बसले; २५ मिनिटांनी उठले, तोवर मतदार...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2024 6:19 PM

यवतमाळ मतदारसंघातील हिवरी येथील मतदान केंद्रात हा प्रकार घडला आहे. सरकारी असले म्हणून काय झाले हे कर्मचारीही माणूसच आहेत. त्यांनाही तहाण, भूक असते. पण...

बँक कर्मचाऱ्यांचे लंच ब्रेकचे अनेक किस्से तुम्ही-आम्ही नेहमीच ऐकतो, अनुभवतो. आज लोकसभा निवडणुकाच्या राज्यातील दुसऱ्या टप्प्यातील मतदान होत आहे. बँकेसारखाच किस्सा राज्यातील एका मतदारसंघात घडला आहे. मतदान केंद्र बंद ठेवण्याची परवानगी नसताना कर्मचाऱ्यांनी तब्बल २५ मिनिटांचे लंच ब्रेक घेत मतदारांना बाहेर ताटकळत ठेवल्याचा प्रकार घडला आहे. 

यवतमाळ मतदारसंघातील हिवरी येथील मतदान केंद्रात हा प्रकार घडला आहे. कर्मचारीही माणूसच आहेत. त्यांनाही तहाण, भूक असते. परंतु, मतदान केंद्राचा दरवाजा बंद करून उन्हा तान्हात उभ्या असलेल्या मतदारांना बाहेर ताटकळत ठेवत आतमध्ये चार-पाच जण पंगतीला बसून गप्पा मारत जेवत असतील तर काय? असा सवाल विचारला जात आहे. 

मतदान प्रक्रिया ही सकाळी सात वाजता सुरु झाली होती. ती अखंड दिवसभर सुरु ठेवायची असते. एका केंद्रावर चार ते पाच कर्मचारी दिलेले असतात. त्यांनी आलटून पालटून जेवण, नाष्टा करायचा असतो. परंतु मतदान बंद करायचे नसते. या नियमाला या कर्मचाऱ्यांनी हरताळ फासत आतमध्ये पंगत मांडल्याचा प्रकार घडला आहे. 

याचा व्हिडीओ व्हायरल झाला असून यवतमाळचे जिल्हाधिकारी पंकज आशिया यांनी या कर्मचाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचे आश्वासन दिले आहे. जास्तीत जास्त मतदान व्हावे यासाठी शासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत. मतदार वेळात वेळ काढून मतदान केंद्रांवर दाखल होत असतात. यवतमाळच्या हिवरी येथील मतदान केंद्रावर चक्क दुपारच्या जेवणासाठी कर्मचाऱ्यांनी मतदान केंद्र बंद ठेवून पंगतीत बसून जेवण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावर जिल्हाधिकारी यांनी पाच ते दहा मिनिटे मतदान बंद केलेले असा दावा केला आहे. 

टॅग्स :yavatmal-washim-pcयवतमाळ-वाशिमmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगYavatmalयवतमाळ