१.६४ रूपयांत मिळेल ५०० एमबी डेटा, वर्षभर रिचार्जमधून सुट्टी; पाहा Reliance Jio चा जबरदस्त प्लॅन

Published: May 11, 2021 04:35 PM2021-05-11T16:35:40+5:302021-05-11T16:42:50+5:30

Reliance Jio : सध्या कंपनी ग्राहकांना अनेक चांगल्या ऑफर्स देत आहेत.

सध्या देशात दूरसंचार कंपन्यांमध्ये आपले ग्राहक टिकवण्यासाठी तसंच आपल्याकडे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी मोठी स्पर्धा सुरू आहे.

अशा परिस्थिती कंपन्याही ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी निरनिराळे प्लॅन्स बाजारात आणत आहेत.

रिलायन्स जिओच्या या क्षेत्रातील प्रवेशानंतर अन्य दूरसंचार कंपन्यांचे धाबे दणाणले होते.

तसंच सध्या कंपनी इतर कंपन्यांच्या तुलनेत स्वस्त प्लॅन्सही ग्राहकांसाठी घेऊन येत आहे.

आज आपण Reliance Jio चा असा प्लॅन पाहू ज्यामध्ये ग्राहकांना केवळ १.६४ रुपयांत ५०० एमबी डेटा मिळतो.

रिलायन्स जिओचा हा प्लॅन २३९९ रूपयांचा (Jio 2399 prepaid plan) आहे. यामध्ये ग्राहकांना केवल १.६४ रूपयांमध्ये ५०० एमबी डेटा मिळतो.

रिलायन्स जिओचा हा प्लॅन ३६५ दिवसांच्या वैधतेसह येतो. तसंच कंपनीनं हा प्लॅन Best Seller या कॅटेगरीतही ठेवला आहे.

याचाच अर्थ कंपनीच्या सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या प्लॅनपैकी हा एक प्लॅन आहे. यामध्ये डेटा सोबतच अनलिमिटेड कॉलिंग आणि अन्य सुविधाही मिळतात.

रिलायन्स जिओच्या या प्लॅनमध्ये दररोज २ जीबी डेटा मिळतो. याचाच अर्थ ३६५ दिवसांसाठी कंपनी ग्राहकांना ७३० जीबी डेटा देते.

याचाच अर्थ एक जीबी डेटाची किंमत होते ३.२८ रूपये. याप्रकारे पाहिलं तर ५०० एमबी डेटाची किंमत १.६४ रूपये इतकी आहे.

केवळ ३.२८ रूपयांमध्ये १ जीबी डेटा ही बेस्ट डील असू शकेल.

कंपनी या प्लॅन सोबत सर्व ग्राहकांना सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएसची सुविधाही देते.

याशिवाय कंपनी ग्राहकांना JioTV, JioCinema, JioCloud, JioSecurity, आणि JioNew सारख्या अॅप्सचही सबस्क्रिप्शनही देते.

ज्यांना सतत रिचार्ज करण्यापासून मुक्ती हवी आहे अशा ग्राहकांसाठी हा प्लॅन उत्तम आहे.

तसंच अधिक डेटा हवा असलेल्यांसाठीही हा प्लॅन उत्तम आहे.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!