झारखंडमध्ये असा दुर्मिळ खजिना, ज्यामुळे भारत होणार आत्मनिर्भर, याबाबतीत चीनवरील अवलंबित्व होणार कमी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2020 09:00 AM2020-07-14T09:00:35+5:302020-07-14T09:35:42+5:30

झारखंडमध्ये जमिनीखाली टंगस्टन या दुर्मीळ धातूचा मोठा साठा असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे टंगस्टनच्या उत्पादनात भारत आत्मनिर्भर होणार असून, याबाबतीत चीनवर असलेले अवलंबित्व कमी होणार आहे.

लडाखमध्ये चिनी सैन्याने केलेली घुसखोरी आणि गलवानमधील हिंसक संघर्षात २० जवानांना वीरमरण आल्यामुळे भारत आणि चीनमधील संबंध कमालीचे बिघडले आहे. त्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने विविध क्षेत्रात चीनवर असलेले अवलंबित्व कमी करून आत्मनिर्भर होण्याच्या दिशेने पावले टाकण्यास सुरुवात केली आहे.

भारत सरकारच्या या प्रयत्नांना आता झारखंडमध्ये सापडलेल्या एका दुर्मीळ खजिन्यामुळे बळ मिळणार आहे. झारखंडचा देशातील गरीब आणि मागास राज्यांमध्ये समावेश होत असला तरी हे राज्य खनिज संपत्तीने समृद्ध आहे. आता येथील जमिनीखाली एका दुर्मीळ धातूचा शोध लागला आहे.

आता झारखंडमध्ये जमिनीखाली टंगस्टन या दुर्मीळ धातूचा मोठा साठा असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे टंगस्टनच्या उत्पादनात भारत आत्मनिर्भर होणार असून, याबाबतीत चीनवर असलेले अवलंबित्व कमी होणार आहे.

झारखंडमधील गढवा जिल्ह्यातील सलतुआ परिसरात टंगस्टनचे हे साठे सापडले आहेत. जीएसआयने केंद्र सरकारला याबाबत माहिती दिली आहे.

टंगस्टनचा दुर्मीळ खनिजांच्या श्रेणीत समावेश होतो. जिओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाकडून याबाबत काम करण्यात येत आहे. सध्या हे काम जी ३ स्टेजमध्ये आहे. म्हणजेच सध्या याची तपासणी सुरू आहे. जीएसआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या वर्षाच्या अखेरीच मॅपिंग आणि ड्रिलिंग सुरू करण्यात येईल.

मात्र सध्यातरी येथी साठ्यांबाबत कुठलीही माहिती देण्यास जीएसआयचे अधिकारी नकार देत आहेत. टंगस्टनचा साठा किती आहे. याचे आकलन अद्याप करण्यात आलेले नाही. झारखंडमधील हा टंगस्टनचा पहिलाच साठा आहे. भूशास्त्रज्ञ अनिल सिन्हा यांनी सांगितले की, झारखंडमध्ये टंगस्टनचा साठा मिळाल्याने याबाबती देश आत्मनिर्भर होणार आहे आणि अन्य देशांवरील अवलंबित्व कमी होणार आहे.

 सध्या भारत आहे चीनवर अवलंबून - Marathi News | सध्या भारत आहे चीनवर अवलंबून | Latest business Photos at Lokmat.com

सध्या भारत १०० टक्के टंगस्टनची आयात करतो. टंगस्टनचा सर्वात मोठा निर्यातदार चीन आहे. चीनमध्ये टंगस्टनचे ५६ टक्के साठे आहेत. रशियामध्ये ५ टक्के, व्हिएतनाममध्ये ३नटक्के आणि मंगोलियामध्ये टंगस्टनचे २ टक्के साठे आहेत. पुढच्या काळात चीनसोबतचा व्यापार कमी होण्याच्या परिस्थितीत झारखंडमध्ये सापडलेले टंगस्टनचे हे साठे मदतगार ठरू शकतात.

 टंगस्टनचे उपयोग - Marathi News | टंगस्टनचे उपयोग | Latest business Photos at Lokmat.com

एकेकाळी टंगस्टनचा सर्वाधिक वापर हा विजेच्या बल्बमध्ये केला जात असे. मात्र आता फायटर जेट रॉकेट, एअरक्राफ्ट, अॅटॉमिक पॉवर प्लँट, ड्रिलिंग आणि कटिंग टूल्स, स्टेनलेस स्टील वेल्डिंग, इलेक्ट्रोड, फ्लोरेसेंट लायटिंग, दातांवरील उपचार आणि उच्च तापमान असलेल्या ठिकाणी याचा उपयोग होतो.

 भारतातील टंगस्टनचे साठे - Marathi News | भारतातील टंगस्टनचे साठे | Latest business Photos at Lokmat.com

झारखंडशिवाय राजस्थानमधील नागौर, महाराष्ट्रातील नागपूर आणि पश्चिम बंगालमधील बाकुडा येथे टंगस्टनचे साठे असल्याचे समोर आले आहे. राजस्थानमधील डेगाना येथेसुद्धा टंगस्टनचे साठे असल्याचे अनेक वर्षांपूर्वी समोर आले होते. मात्र येथील खोदकाम अद्याप सुरू झालेले नाही.