राकेश झुनझुनवाला यांचा फेव्हरिट स्टॉक! TATA च्या या दिग्गज शेअरनं केलं मालामाल, १ लाखाचे केले ४.५ कोटी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2026 16:49 IST2026-03-26T16:36:57+5:302026-03-26T16:49:33+5:30
रेखा झुनझुनवाला यांच्याकडे कंपनीचे तब्बल ४७१८४४७० शेअर्स आहेत. अर्थात रेखा झुनझुनवाला यांची कंपनीत ५.३१% हिस्सेदारी आहे...

टाटा समूहातील दिग्गज कंपनी 'टायटन'ने आपल्या गुंतवणूकदारांना छप्परफाड परतावा देत मालामाल केले आहे. बोनस शेअर्स आणि स्टॉक स्प्लिटच्या जोरावर या शेअरने गेल्या १५ वर्षांत १ लाखाचे ४ कोटी रुपये केले आहेत.

महत्वाचे म्हणजे, शेअर बाजारचे 'बिग बुल' मानल्या जाणाऱ्या दिवंगत राकेश झुनझुनवाला यांचा हा आवडता शेअर होता. आजही त्यांच्या पत्नी रेखा झुनझुनवाला यांची यात मोठी भागीदारी आहे.

२५ मार्च २०११ रोजी टायटनच्या एका शेअरची किंमत १७५.४५ रुपये होती. जर तेव्हा एखाद्या गुंतवणूकदाराने या शेअरमध्ये १ लाख रुपये गुंतवले असते, तर त्याला ५६८ शेअर्स मिळाले असते. जून २०११ मध्ये कंपनीने एक बोनस शेअरही दिला आहे.

याव्यतिरिक्त, त्याचे शेअर्स १० भागांमध्ये विभागले गेले आहेत. टायटनने जारी केलेले बोनस शेअर्स आणि शेअर स्प्लिट जोडल्यास, एकूण शेअर्सची संख्या ११,३६० होते. २५ मार्च २०२६ रोजी बीएसईवर टायटनचा शेअर ₹४०३८.४० वर बंद झाला. यानुसार, ११,३६० शेअर्सचे सध्याचे मूल्य ₹४.५८ कोटी आहे. यात कंपनीने दिलेला लाभांश समाविष्ट नाही.

झुनझुनवाला यांचा फेव्हरिट स्टॉक...! - टायटनमध्ये राकेश झुनझुनवाला यांची मोठी गुंतवणूक होती. त्यांच्या निधनानंतर आता त्यांच्या पत्नी रेखा झुनझुनवाला यांच्याकडे कंपनीचे तब्बल ४७१८४४७० शेअर्स आहेत. अर्थात रेखा झुनझुनवाला यांची कंपनीत ५.३१% हिस्सेदारी आहे.

गेल्या पाच वर्षांत हा शेअर १६८ टक्क्यांची वधारला आहे. एका वर्षात ३२ टक्क्यांची तेजी दिसून आली आहे.

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)

















