ट्रेन लेट होतेय किंवा रात्री उशिरा पोहोचलाय स्टेशनवर... घरी जाण्याची काळजी करू नका, 25 रुपयांत बुक होईल एसी रूम

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2023 11:31 AM2023-04-27T11:31:02+5:302023-04-27T11:37:48+5:30

Railway Retiring Room Booking : देशातील जवळपास सर्वच स्थानकांवर रेल्वे रिटायरिंग रूमची (Railways Retiring Rooms) सुविधा उपलब्ध आहे.

तुम्ही ट्रेन पकडण्यासाठी रात्री उशिरा रेल्वे स्टेशनवर पोहोचता आणि तुमची ट्रेन तासनतास उशिरा येते किंवा कुठूनतरी लांबचा प्रवास करून येताना ट्रेन तुम्हाला रात्री उशिरा स्टेशनवर उतरवते, असे बरेचदा घडते. त्यामुळे अनेकदा घरी जाणे कठीण असते.

अशा परिस्थितीत काळजी करण्याची गरज नाही, कारण रेल्वे तुम्हाला फक्त 25 रुपयांमध्ये एसी रूम (Railways Retiring Rooms) बुक करण्याची सुविधा देते. देशातील जवळपास सर्वच स्थानकांवर रेल्वे रिटायरिंग रूमची (Railways Retiring Rooms) सुविधा उपलब्ध आहे. त्याचे बुकिंग आयआरसीटीसीच्या (IRCTC) वेबसाइटवरून करता येते.

प्रवासी आपल्या गरजेनुसार सिंगल, डबल बेड रूम बुक करू शकतात. याशिवाय, डॉर्मिटरी (Dormitory) रुम देखील उपलब्ध आहेत, ज्यामध्ये एकाच स्वरूपात अनेक लोकांच्या राहण्याची सोय आहे. या रुम एसी आणि नॉन एसी अशा दोन्ही कॅटगरीमध्ये उपलब्ध असतात.

तुम्ही या रुम किमान 1 तास आणि कमाल 48 तासांसाठी बुक करू शकता. काही स्थानकांवर तासाच्या हिशोबानेही बुकिंग करता येते. सहसा या रुम किमान 12 तास आणि कमाल 48 तासांसाठी बुक केली जाते. सिंगल प्रवासी स्वतःसाठी हवे असेल तर एक सिंगल बेडरूम, एक डबल बेडरूम किंवा डॉर्मिटरीमध्ये एक सिंगल बेड बुक करू शकतो.

तुम्हाला दोन प्रवाशांसाठी हवे असल्यास, तुम्ही डबल बेड रूम बुक करू शकता किंवा डॉर्मिटरीमध्ये 2 बेड बुक करू शकता. एका पीएनआरवर जास्तीत जास्त 6 प्रवाशांसाठी रुम बुक केल्या जाऊ शकतात. यामध्ये डॉर्मिटरीमधील दोन डबल बेड रूम किंवा 6 सिंगल बेड देखील बुक करता येतील.

रुम किंवा बेड बुक करण्यासाठी आयआरसीटीसी भाड्यावर 12 टक्के जीएसटी आकारते. जीएसटी रूम आणि स्लॉटनुसार हे ठरवले जाते. दरम्यान, जर एखादी रुम 12 तासांच्या स्लॉटसाठी बुक केली असेल आणि त्याचे भाडे 500 रुपयांपेक्षा जास्त असेल तर त्यावर जीएसटी आकारला जाईल.

त्याचप्रमाणे 24 तासांचे भाडे 1000 रुपये असेल तर त्यावरही जीएसटी भरावा लागेल. जर खोली एका व्यवहाराद्वारे 24 तासांपेक्षा जास्त काळ बुक केली असेल आणि दुसरा स्लॉट एक्सटेंड करायचा असेल तर तो पहिल्या स्लॉटचा एक्सटेंशन मानला जाईल. या दुसऱ्या स्लॉटवर 25 टक्के अतिरिक्त शुल्क भरावे लागेल.

आयआरसीटीसी स्टेशनवर रूम बुकिंगसाठी सर्व्हिस चार्ज देखील आकारते. आयआरसीटीसी 24 तासांसाठी रिचाइरिंग रुम बुक करण्यासाठी 20 रुपये सर्व्हिस चार्ज आकारेल, तर डॉर्मिटरीमधील बेडसाठी 24 तासांसाठी 10 रुपये सर्व्हिस चार्ज आकारला जाईल.

जर रुम 24 ते 48 तासांसाठी बुक केली असेल तर 40 रुपये सर्व्हिस चार्ज आणि 48 तासांपर्यंत डॉर्मिटरी बेड बुक केल्यास 20 रुपये सर्व्हिस चार्ज भरावा लागेल. तुम्ही हे बुकिंग रद्द केल्यास, 48 तासांपूर्वी रद्द केल्यास 10 टक्के रक्कम कापली जाईल. 48 तासांपेक्षा कमी वेळेत रद्द केल्यास, बुकिंगच्या रकमेपैकी 50 टक्के कपात केली जाईल.

त्याचप्रमाणे, त्याच दिवशी बुकिंग रद्द केल्यास, 100 टक्के रक्कम जमा केली जाईल आणि कोणताही परतावा दिला जाणार नाही. दरम्यान, यामध्ये पॅसेंजर वाइस कॅन्सल होत नाही, तर रुम वाइस कॅन्सलेशन पॉलिसी लागू राहते.