पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केली तर २४ महिन्यांनंतर किती रुपये मिळतील? पटापट पाहा कॅलक्युलेशन

By जयदीप दाभोळकर | Updated: September 27, 2025 09:22 IST2025-09-27T09:07:21+5:302025-09-27T09:22:54+5:30

Post Office Schemes: पोस्टाच्या या योजनेत तुम्हाल उत्तम परतावा मिळणार आहे. या योजनेमध्ये तुमची पत्नी तुम्हाला मोठ्या प्रमाणात कमाई करुन देऊ शकते.

Post Office Schemes: आजकाल अनेक जण गुंतवणूकीकडे वळत आहेत. मात्र पारंपारिक गुंतवणूकीकडे आजही अनेकांचा मोठ्या प्रमाणात कल आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेनं (RBI) यावर्षी रेपो रेटमध्ये १ टक्क्यांची कपात केली आहे. आरबीआयनं रेपो रेट (Repo Rate) कमी केल्यामुळे देशभरातील बँकांनी त्यांच्या एफडीच्या (FD) व्याजदरात कपात केली आहे.

मात्र, दुसरीकडे, पोस्ट ऑफिस अजूनही आपल्या ग्राहकांना एफडीवर (FD) पूर्वीप्रमाणेच भरघोस व्याज देत आहे. रेपो रेटमध्ये कपात केल्याचा परिणाम पोस्ट ऑफिसच्या एफडी (FD) योजनेच्या व्याजदरांवर अद्याप झालेला नाही. आज आपण जाणून घेऊया की जर पत्नीच्या नावावर पोस्ट ऑफिसमध्ये १ लाख रुपयांची एफडी केली, तर २४ महिन्यांनंतर एकूण किती रक्कम मिळेल?

पोस्ट ऑफिसमधील मुदत ठेवी (FD) टीडी (टाइम डिपॉझिट) म्हणून ओळखल्या जातात. पोस्ट ऑफिसची टीडी योजना बँक एफडी सारखीच असते. बँक एफडी प्रमाणे, टीडी विशिष्ट कालावधीत हमी निश्चित परतावा देतात. पोस्ट ऑफिस आपल्या ग्राहकांना १ वर्ष, २ वर्षे, ३ वर्षे आणि ५ वर्षांसाठी टीडी खाते उघडण्याचा पर्याय देते.

पोस्ट ऑफिस १ वर्षाच्या टीडीवर ६.९ टक्के, २ वर्षांच्या टीडीवर ७.० टक्के, ३ वर्षांच्या टीडीवर ७.१ टक्के आणि ५ वर्षांच्या टीडीवर ७.५ टक्के असा बंपर व्याजदर देते. पोस्ट ऑफिस टीडी खात्यात किमान डिपॉझिट रक्कम ₹१,००० आहे, ज्याची कमाल मर्यादा नाही. याचा अर्थ तुम्ही या योजनेत तुम्हाला हवे तितके पैसे जमा करू शकता.

पोस्ट ऑफिस सर्व ग्राहकांना सारखाच रिटर्न देते. महिला, पुरुष, ज्येष्ठ नागरिक अशा सर्व प्रकारच्या ग्राहकांना पोस्ट ऑफिसच्या टीडी (TD) स्कीमवर समान व्याज मिळतं. जर तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये २४ महिने म्हणजेच २ वर्षांच्या टीडीमध्ये तुमच्या पत्नीच्या नावाने १,००,००० रुपये जमा केले, तर मॅच्युरिटीवर (मुदतपूर्तीवर) तुमच्या पत्नीच्या खात्यात एकूण १,१४,८८८ रुपये जमा होतील.

यात तुमच्या गुंतवणुकीचे १,००,००० रुपये आणि १४,८८८ रुपये व्याज समाविष्ट आहे. पोस्ट ऑफिसच्या टीडी स्कीमवर देखील ग्राहकांना गॅरंटीसह एक निश्चित व्याज मिळतं, ज्यात कोणत्याही प्रकारचा चढ-उतार होत नाही आणि तुमच्या गुंतवणूकीला कोणताही धोका नसतो.

(टीप - यामध्ये सामान्य माहिती दिली आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)