Post Office मध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹४४,९९५ चं फिक्स व्याज, मिळणार सरकारची गॅरेंटी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2026 09:20 IST2026-03-11T09:07:29+5:302026-03-11T09:20:04+5:30
Post Office Investment: पोस्ट ऑफिस आपल्या ग्राहकांना बचत खात्यावर अतिशय आकर्षक व्याजदर देत आहे. पोस्ट ऑफिसमधील काही निवडक बचत योजनांवर मिळणारं व्याज देशातील आघाडीच्या बँकांकडून दिल्या जाणाऱ्या व्याजापेक्षाही अधिक आहे.

Post Office Investment: पोस्ट ऑफिस आपल्या ग्राहकांना बचत खात्यावर अतिशय आकर्षक व्याजदर देत आहे. पोस्ट ऑफिसमधील काही निवडक बचत योजनांवर मिळणारं व्याज देशातील आघाडीच्या बँकांकडून दिल्या जाणाऱ्या व्याजापेक्षाही अधिक आहे.

पोस्ट ऑफिसची 'टीडी' (टाइम डिपॉझिट) योजना ही पूर्णपणे बँकेच्या एफडीसारखीच असून, यामध्ये एका ठराविक काळानंतर खात्रीशीर व्याजासह संपूर्ण रक्कम परत मिळते. या योजनेचं सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये केवळ १ लाख रुपये जमा करून तुम्ही ४४,९९५ रुपयांचे बंपर व्याज कमावू शकता.

पोस्ट ऑफिसमध्ये १ वर्ष, २ वर्षे, ३ वर्षे आणि ५ वर्षांच्या कालावधीसाठी एफडी खातं म्हणजेच टीडी खातं उघडता येतं. बँकांच्या एफडीप्रमाणेच येथेही मॅच्युरिटीनंतर निश्चित व्याजासह पूर्ण पैसे परत मिळतात.

पोस्ट ऑफिसच्या बचत योजनांचे सर्वात मोठं बलस्थान म्हणजे यावर थेट केंद्र सरकारचं नियंत्रण असतं, ज्यामुळे ग्राहकांना सरकारी गॅरंटीसह सुरक्षिततेची खात्री मिळते. सध्या पोस्ट ऑफिस १ वर्षाच्या टीडीवर ६.९ टक्के, २ वर्षांच्या टीडीवर ७.० टक्के, ३ वर्षांच्या टीडीवर ७.१ टक्के आणि ५ वर्षांच्या टीडीवर ७.५ टक्के व्याज देत आहे.

जर तुम्ही पोस्ट ऑफिसच्या ५ वर्षांच्या टीडी योजनेमध्ये १,००,००० रुपये जमा केले, तर मॅच्युरिटी पूर्ण झाल्यावर तुम्हाला एकूण १,४४,९९५ रुपये मिळतील. या रक्कमेमध्ये ४४,९९५ रुपयांच्या निश्चित व्याजाचा समावेश आहे. सध्याच्या काळात देशातील कोणतीही मोठी बँक ५ वर्षांच्या एफडी योजनेवर ७.५ टक्के इतका उच्च व्याजदर देत नाही, जो पोस्ट ऑफिसमध्ये उपलब्ध आहे.

पोस्ट ऑफिसच्या टीडी योजनेत गुंतवणूक करताना एक गोष्ट लक्षात घेणं आवश्यक आहे की, येथे सर्व वयोगटातील ग्राहकांना समान दरानं व्याज दिलं जातं. याउलट बँकांमध्ये ज्येष्ठ नागरिकांना सामान्य नागरिकांच्या तुलनेत साधारणपणे ०.५० टक्के अधिक व्याज मिळतं.

इतकंच नाही तर काही बँका ८० वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या अति-ज्येष्ठ नागरिकांना त्याहूनही अधिक व्याजदर ऑफर करतात. मात्र पोस्ट ऑफिसमध्ये सर्वांसाठी एकच दर लागू असतो.

















