शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Wife सोबत मिळून पोस्टाच्या ‘या’ स्कीममध्ये करा गुंतवणूक; महिन्याला मिळेल ₹९२५० चं फिक्स व्याज

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2026 10:39 IST

1 / 7
भविष्याच्या दृष्टीनं गुंतवणूक ही महत्त्वाची आहे. आजकाल अनेक जण गुंतवणूकीकडे वळू लागलेत. पण बहुतांश जणांना आपली गुंतवणूक सुरक्षित राहावी असं वाटत असतं. अशातच पोस्टाची स्कीम उत्तम ठरू शकते. या स्कीम्सना सरकारचा पाठिंबा असल्यानं तुमचे पैसे सुरक्षित राहतात.
2 / 7
आरबीआयनं (RBI) गेल्या वर्षी रेपो रेटमध्ये १.२५ टक्क्यांची कपात करूनही, पोस्ट ऑफिसच्या विविध बचत योजनांवर पूर्वीप्रमाणेच बंपर व्याज मिळत राहणार आहे. वास्तविक, वित्त मंत्रालयाने चालू आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीसाठी देखील पोस्ट ऑफिसच्या बचत योजनांवरील व्याजदर स्थिर ठेवण्याचा निर्णय घेतलाय.
3 / 7
आज आम्ही तुम्हाला पोस्ट ऑफिसच्या अशाच एका योजनेबद्दल सांगणार आहोत, ज्यामध्ये तुम्ही तुमची पत्नी, आई, वडील, मुलगा, मुलगी, भाऊ किंवा बहीण यांच्यासोबत गुंतवणूक करून दरमहा ९,२५० रुपयांचे फिक्स व्याज मिळवू शकता. ही योजना म्हणजे पोस्ट ऑफिसची 'मंथली इनकम स्कीम' (MIS).
4 / 7
पोस्ट ऑफिसच्या मंथली इनकम स्कीमवर (MIS) सध्या ७.४ टक्के वार्षिक व्याज मिळत आहे. या योजनेत तुम्ही किमान १,००० रुपयांपासून खाते उघडू शकता. एमआयएस (MIS) योजनेअंतर्गत तुम्ही सिंगल अकाउंटमध्ये जास्तीत जास्त ९ लाख रुपये जमा करू शकता, तर जॉइंट अकाउंटमध्ये (संयुक्त खाते) जास्तीत जास्त १५ लाख रुपये जमा केले जाऊ शकतात.
5 / 7
या योजनेच्या जॉइंट अकाउंटमध्ये जास्तीत जास्त ३ व्यक्तींचा समावेश होऊ शकतो. जर तुम्ही या योजनेत जॉइंट खात्याद्वारे तुमच्या पत्नीसोबत मिळून १५ लाख रुपयांची कमाल गुंतवणूक केली, तर तुम्हाला दरमहा मोठी कमाई होऊ शकते. पोस्ट ऑफिसच्या एमआयएस योजनेत १५ लाख रुपये जमा केल्यास तुम्हाला दरमहा ९,२५० रुपयांचे फिक्स व्याज मिळेल.
6 / 7
पोस्ट ऑफिसच्या एमआयएस योजनेत दरमहा व्याजाचं पेमेंट केलं जातं. व्याजाची ही रक्कम थेट तुमच्या बँक खात्यात ट्रान्सफर केली जाते. ही योजना ५ वर्षांत मॅच्युअर होते. मॅच्युरिटीनंतर तुमच्या गुंतवणुकीचे सर्व पैसे देखील तुमच्या खात्यात ट्रान्सफर केले जातात.
7 / 7
विशेष म्हणजे, पोस्ट ऑफिसमध्ये एमआयएस खातं उघडण्यासाठी तुमच्याकडे पोस्ट ऑफिसचे सेव्हिंग्स अकाउंट असणं अनिवार्य आहे. जर तुमचे पोस्ट ऑफिसमध्ये कोणतंही बचत खातं नसेल, तर तुम्हाला आधी ते उघडावं लागेल, त्यानंतरच तुम्ही मंथली इनकम स्कीममध्ये खातं उघडू शकता; कारण व्याजाचे पैसे पोस्ट ऑफिसच्या बचत खात्यातच जमा केले जातात.
टॅग्स :Post Officeपोस्ट ऑफिसInvestmentगुंतवणूकMONEYपैसा