PF काढण्याच्या नियमांत झाला बदल; आता एका तासांत काढू शकता १ लाखांपर्यंतची रक्कम

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2021 08:48 AM2021-07-26T08:48:41+5:302021-07-26T08:56:04+5:30

EPFO : जर तुम्हाला आवश्यकता असेल तर तुम्ही तात्काळ काढू शकता रक्कम. पाहा कसे काढता येतील तुम्हाला १ लाख रुपये.

जर तुम्हाला पैशांची गरज असेल तर तुम्ही सहजरित्या आपल्या पीएफ (PF account) खात्यातून पैसे काढू शकता. पीए खातं असेल तर आता तुम्हाला एका तासांत एक लाख रूपयांपर्यंतची रक्कम काढता येऊ शकते.

दरम्यान, कोरोना संकट काळात लोकांना असलेली पैशांची गरज पाहता EPFO नं ग्राहकांसाठी नवी सुविधा सुरू केली आहे. आता तुम्ही आपल्या Employees Provident Fund (EPF) मधून एक लाख रूपयांपर्यंत अॅडव्हान्स पीएफ बॅलन्स काढू शकता.

तुम्ही कोणत्याही मेडिकल इमर्जन्सीसाठी (Medical Emergency) हे पैसे काढू शकता. परंतु अशा प्रकारे पैसे काढायचे असल्यास तुम्हाला पैशांचा खर्च दाखवावा लागेल.

EPFO नं यासंदर्भात एक सर्क्युलर जारी केलं आहे. दरम्यान, कर्मचाऱ्यांना आता त्यांच्या पीएफ खात्यातून मेडिकल एमर्जन्सीदरम्यान १ लाखांपर्यंत रक्कम काढता येणार असल्याचंही त्यात नमूद केलं आहे.

कोरोना विषाणू व्यतिरिक्त अन्य आजारांमुळे आपात्कालिन परिस्थिती उद्भवल्यास रुग्णालयात दाखल केल्यानंतरही कर्मचाऱ्या त्यांच्या पीफ खात्यातून ही रक्कम काढता येऊ शकते.

यापूर्वीही कर्मचाऱ्यांना आपल्या ईपीएफ खात्यातून मेडिकल इमर्जन्सीसाठी पैसे काढता येत होतं. परंतु त्यासाठी आधी बिल जमा करावं लागत होतं. ही सेवा त्यापेक्षा निराळी आहे.

ही रक्कम काढण्यासाठी तुम्हाला www.epfindia.gov.in या संकेतस्थळावरील होम पेजवर असलेल्या Covid-19 टॅबवर असलेल्या ऑनलाइन अॅडव्हान्स्ड क्लेमवर क्लिक करावं लागेल.

त्यानंतर ऑनलाइन सेवांवर जाऊन क्लेम (फॉर्म -31,19,10 सी आणि 10 डी) सिलेत्ट करा. त्यानंतर तुमच्या बँक खात्याचे अखेरचे चार क्रमांक त्या ठिकाणी टाका. त्यानंतर त्या ठिकाणी असलेल्या Proceed for Online Claim वर क्लिक करा. ड्रॉप डाऊनमध्ये PF Advance (Form 31) वर क्लिक करा.

त्यानंतर तुम्हाला कोणत्या कारणासाठी रक्कम काढायची आहे ते कारण निवडा. तुम्हाला हवी असलेली रक्कम त्या ठिकाणी टाकून तुमच्या चेकची स्कॅन कॉपी अपलोड करा आणि तुमचा पत्ता लिहा.

यानंतर त्या ठिकाणी असलेल्या Get Aadhaar OTP वर क्लिक करा आणि आधार लिंक्ड मोबाईवर आलेला ओटीपी एन्टर करा. त्यानंतर तुमचा क्लेम रजिस्टर होईल.