LPG Offer: केवळ ९ रुपयांत घरगुती सिलेंडर बुक करा; ऑफरचा फायदा घेण्यासाठी आज शेवटची संधी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2021 01:38 PM2021-05-31T13:38:47+5:302021-05-31T13:42:19+5:30

Paytm LPG Cashback Offer: डिजिटल पेमेंट App ने घरगुती गॅस सिलेंडरवर कॅशबॅक ऑफर ठेवली आहे.

जर तुम्ही तुमच्या घरात एलपीजी(LPG Gas) सिलेंडर ऑर्डर करण्याचा विचार करत असाल तर आज तुमच्याकडे शेवटची संधी आहे ज्यात तुम्ही केवळ ९ रुपयांत LPG सिलेंडरची खरेदी करू शकता.

या ऑफरचा ३१ मे म्हणजे आज शेवटचा दिवस आहे. या ऑफरअंतर्गत तुम्ही Paytm वरून ८०९ रुपयांचा सिलेंडर अवघ्या ९ रुपयांत खरेदी करू शकता.

ही ऑफर Paytm आणि इंडियन ऑयल कॉर्पोरेशनकडून देण्यात आली आहे. या ऑफरचा फायदा तेच ग्राहक घेऊ शकतात जे पहिल्यांदा Paytm वरून सिलेंडर बुक करण्यासाठी पेमेंट करत आहेत. म्हणजे ज्यांनी याआधी कधीही Paytm वरून सिलेंडर बुक केला नसेल त्यांना या ऑफरचा फायदा होणार आहे.

नेमकं या ऑफरचा फायदा कसा घेऊ शकता? पेटीएमच्या या ऑफर अंतर्गत ग्राहकांना स्क्रॅच कार्ड दिलं जाईल. ज्याची कॅशबॅक किंमत ८०० रुपयांपर्यंत असेल. ऑफर फक्त पहिल्या LPG सिलेंडरच्या बुकींगवर एप्लाय करता येऊ शकेल.

या ऑफरचा लाभ कमीत कमी ५०० रुपयाच्या पेमेंटवर मिळणार आहे. या कॅशबॅकचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना स्क्रॅच कार्डला उघडावं लागेल. यात १० रुपयांपासून ८०० रुपयांपर्यंत पैसे तुम्हाला मिळू शकतात.

या स्क्रॅच कार्डचा वापर ७ दिवसांच्या आतमध्ये करणं गरजेचे आहे. त्यानंतर तुम्हाला या संधीचा फायदा घेता येणार नाही. ऑफरचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला प्रोमो कोड एप्लाय करणं आवश्यक आहे. जर तुमच्या फोनमध्ये पेटीएम नसेल तर प्लेस्टोरवरून ते डाऊनलोड करू शकता

त्यानंतर गॅस सिलेंडरची बुकींग करावी लागणार आहे. त्यासाठी paytm वर Show More या पर्यायावर जाऊन क्लिक करावं लागेल. याठिकाणी Recharge & Bills Pay असा पर्याय असेल त्यावर क्लिक करा.

त्यानंतर तुम्हाला बुक सिलेंडरचा पर्याय दिसेल. त्यावर जाऊन तुम्ही गॅस प्रोव्हाडर सिलेक्ट करा. बुकींगच्या आधी तुम्हाला FIRSTLPG चा प्रोमो कोड टाकावा लागेल.

त्याचसोबत Paytm वेबसाईटवर जाऊनही तुम्ही सिलेंडर बुकींग करू शकतो. दिल्लीत सध्या १४.२ किलो विनाअनुदानित सिलेंडरचा दर ८०९ रुपये इतका आहे.

१ जून पासून घरगुती गॅसच्या किंमतीत बदल होण्याची शक्यता आहे. दर महिन्याच्या १ तारखेला आणि १५ तारखेला घरगुती गॅसच्या दरात बदल केला जातो.

टॅग्स :पे-टीएमPaytm