Wife सोबत मिळून Post Office मध्ये उघडा खातं; दरमहा मिळेल ₹९,२५० चं फिक्स व्याज, कोणती आहे स्कीम?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2026 08:37 IST2026-02-10T08:29:58+5:302026-02-10T08:37:19+5:30
Post Office Scheme for Investment: पोस्ट ऑफिस आपल्या ग्राहकांच्या विविध गरजा लक्षात घेऊन अनेक प्रकारच्या बचत योजना राबवत आहे. पोस्ट ऑफिसमध्ये आरडी, टीडी, एमआयएस, पीपीएफ, किसान विकास पत्र यांसारखी अनेक बचत खाती उघडली जातात.

Post Office Scheme: पोस्ट ऑफिस आपल्या ग्राहकांच्या विविध गरजा लक्षात घेऊन अनेक प्रकारच्या बचत योजना राबवत आहे. पोस्ट ऑफिसमध्ये आरडी, टीडी, एमआयएस, पीपीएफ, किसान विकास पत्र यांसारखी अनेक बचत खाती उघडली जातात.

आज आपण येथे पोस्ट ऑफिसच्या एमआयएस म्हणजेच 'मंथली इनकम स्कीम'बद्दल जाणून घेणार आहोत. पोस्ट ऑफिसच्या या मासिक उत्पन्न योजनेवर सध्या ७.४ टक्के दरानं वार्षिक व्याज मिळत आहे. या योजनेत तुम्हाला फक्त एकदाच गुंतवणूक करावी लागते, ज्यानंतर तुम्हाला ५ वर्षांपर्यंत दरमहा गॅरंटीड निश्चित व्याज मिळत राहतं.

जर तुम्ही या योजनेत तुमच्या पत्नीसोबत किंवा कुटुंबातील इतर कोणत्याही सदस्यासोबत मिळून खाते उघडले, तर तुम्हाला दरमहा जास्तीत जास्त ९२५० रुपयांपर्यंत निश्चित व्याज मिळू शकते.

एमआयएसमध्ये तुम्ही किमान १००० रुपयांच्या गुंतवणुकीसह खातं उघडू शकता. या योजनेअंतर्गत तुम्ही सिंगल आणि संयुक्त जॉइंट अशा दोन्ही प्रकारचं खातं उघडू शकता. सिंगल खात्यात जास्तीत जास्त ९ लाख रुपये जमा केले जाऊ शकतात, तर जॉईंट खात्यात कमाल १५ लाख रुपये जमा करण्याची सुविधा आहे.

पोस्ट ऑफिसच्या एमआयएस योजनेअंतर्गत संयुक्त खात्यात तुम्ही जास्तीत जास्त ३ व्यक्तींची नावं नोंदवू शकता. जर तुम्ही या योजनेच्या संयुक्त खात्यात तुमच्या पत्नीसोबत १५ लाख रुपयांची गुंतवणूक केली, तर केवळ व्याजाच्या माध्यमातून तुमची दरमहा बसल्या जागी चांगली कमाई सुरू होऊ शकते.

या योजनेअंतर्गत मिळणारी व्याजाची रक्कम थेट तुमच्या बँक खात्यात जमा केली जाते. जर तुम्ही तुमच्या पत्नीसोबत मिळून पोस्ट ऑफिसच्या एमआयएस योजनेत १५ लाख रुपये जमा केले, तर तुम्हाला दरमहा ९२५० रुपये निश्चित व्याज मिळेल.

पोस्ट ऑफिसची ही एमआयएस योजना ५ वर्षात मॅच्युअर होते. मुदत पूर्ण झाल्यानंतर तुमचे गुंतवणुकीचे सर्व पैसे देखील तुमच्या खात्यात परत केले जातात. विशेष म्हणजे, पोस्ट ऑफिसमध्ये एमआयएस खातं उघडण्यासाठी तुमच्याकडे पोस्ट ऑफिसचं बचत खातं असणं आवश्यक आहे.

















