शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Fuel Price Hike: इंधनदरवाढीवर नितीन गडकरींनी सूचवला भन्नाट उपाय; लीटरमागे २० रुपयांची बचत शक्य!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2021 7:22 PM

1 / 10
नवी दिल्ली: गेल्या अनेक दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी वाढ होत असल्याचे पाहायला मिळत आहे. देशातील ७ हून अधिक राज्यांमध्ये पेट्रोल दराने १०० रुपयांची पातळी ओलांडली आहे.
2 / 10
तर, पेट्रोलपाठोपाठ डिझेलनेही शंभरी ओलांडल्याचे पाहायला मिळाले आहे. एकीकडे कोरोनाचे संकट आणि दुसरीकडे सलगच्या इंधनदरवाढीमुळे सामान्य नागरिक, व्यवसायिक त्रस्त झाले आहेत. (Nitin Gadkari on Fuel Price Hike)
3 / 10
पेट्रोलियम कंपन्यांनी केलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीमुळे दोन्हींच्या किमती विक्रमी पातळीवर गेल्या आहेत. यावर, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितिन गडकरी यांनी एक उपाय सूचवला आहे.
4 / 10
पेट्रोल आणि डिझेलमधील महागाईला इथेनॉल हाच एक पर्याय असल्याचा पुनरुच्चार नितीन गडकरी यांनी केला आहे. ते एका परिषदेला संबोधित करत होते. भारतात देखील इथेनॉलचे उत्पादन वाढवण्यात आले असल्याचे ते म्हणाले.
5 / 10
पेट्रोल आणि डिझेलच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे स्वस्त इंधन पर्याय बाजारात आवश्यक आहे. अमेरिका, कॅनडा तसेच ब्राझील अशा पाश्चिमात्य देशांमध्ये वाहन उत्पादकांनी मिश्र इंधनाचा पर्याय असणाऱ्या वाहनांची निर्मिती सुरु केली आहे.
6 / 10
या वाहनांमध्ये १०० टक्के पेट्रोल किंवा १०० टक्के बायो इथेनॉलचा पर्याय आहे, असे गडकरी यांनी सांगितले. इथेनॉल किफायतशीर असून पर्यावरणपूरक तसेच देशांतर्गत उत्पादित होणारे इंधन आहे.
7 / 10
रेसिंग कारसाठी इंधन म्हणून इथेनॉलचा वापर करतात. मागील काही वर्षात पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळण्याचे प्रमाण टप्याटप्यात वाढवण्यात आले आहे. २०२५ पर्यंत देशात पेट्रोलमधील इथेनॉलचे प्रमाण २० टक्क्यांपर्यंत वाढवणार असल्याचे नितीन गडकरी म्हणाले.
8 / 10
इथेनॉलचा दर प्रती लीटर ६० ते ६२ रुपये असेल. त्यातुलनेत पेट्रोल १०० रुपयांवर आहे. इथेनॉल आणि पेट्रोलच्या तुलना केल्यास एक लीटर इथेनॉल हे ७५० ते ८०० मिली पेट्रोल इतके असेल.
9 / 10
यातही ग्राहकाची २० रुपयाची बचत होईल, असा विश्वास नितीन गडकरी यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला आहे. दरम्यान, देशभरात शुक्रवारी पेट्रोल आणि डिझेलमध्ये वाढ झाली आहे. पेट्रोल २७ पैसे आणि डिझेलमध्ये २८ पैशांची वाढ झाली आहे.
10 / 10
या दरवाढीनंतर मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये साध्या पेट्रोलचा भाव १०५ रुपयांवर गेला आहे. तर प्रीमियम पेट्रोल १०८.६७ रुपये झाले आहे. मुंबईत पेट्रोल १०३ रुपये झाले आहे. इंधनदरवाढीने ग्राहकांचे कंबरडे मोडले असून देशभरात सरकार विरोधात संताप व्यक्त होत आहे.
टॅग्स :Fuel Hikeइंधन दरवाढNitin Gadkariनितीन गडकरीCentral Governmentकेंद्र सरकारPetrolपेट्रोलDieselडिझेल