Multibagger Stock : 80000% पर्यंतचा जबरदस्त परतावा; या 5 शेअर्सनी केलं मालामाल, अदानींची कंपनीही लिस्टमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2023 03:43 PM2023-01-02T15:43:42+5:302023-01-02T15:49:36+5:30

आज आम्ही आपल्याला अशाच 5 कंपन्यांसंदर्भात माहिती देणार आहोत, ज्यांनी गेल्या केवळ 3 वर्षांतच बम्पर परतावा दिला आहे. यातील एका कंपनीने तर 80,000 टक्क्यांपर्यंतचा परतावा दिला आहे.

शेअर बाजारात गुंतवणूक करताना योग्य कंपनीच्या शेअर्सवर डाव लावणे जेवढे महत्वाचे, तेवढेच त्या कंपनीवर विश्वास टिकवून ठेवणेही महत्त्वाचे असते. आज आम्ही आपल्याला अशाच 5 कंपन्यांसंदर्भात माहिती देणार आहोत, ज्यांनी गेल्या केवळ 3 वर्षांतच बम्पर परतावा दिला आहे. यातील एका कंपनीने तर 80,000 टक्क्यांपर्यंतचा परतावा दिला आहे. महत्वाचे म्हणजे, या यादीत अदानी ग्रुपच्या कंपनीचाही समावेश आहे.

1. - सेल मॅन्युफॅक्चरिंगच्या शेअरच्या किमती 2022 मध्ये 1550 टक्क्यांनी वाढ झाल्याचे दिसून आले आहे. 2021 मध्ये कंपनीच्या शेअर्सनी 1523 टक्क्यांपर्यंतचा परतावा दिला आहे. 31 डिसेंबर 2019 रोजी कंपनीच्या एका शेअरची किंमत 0.78 रुपये होती. ती आता 621.20 रुपयांवप पोहोचली आहे. म्हणजेच 2019 पासून आतापर्यंत कंपनीच्या शेअरच्या किंमतीत जवळपास 79,541 टक्क्यांपर्यंतची तेजी दुसून आली आहे.

2. - वर्ष 2022 मध्ये हाई रिटर्न देणाऱ्या कंपन्यांच्या यादीत Jagsonpal Pharmaceuticals चे नावही आहे. कंपनीच्या शेअरच्या किंमतीत गेल्या एका वर्षात 107.42 टक्क्यांपर्यंतची वाढ दिसून आली आहे. तसेच, 2021 मध्ये कंपनीच्या शेअरचा भाव 150.31 टक्क्यांनी वाढला होता.

महत्वाचे म्हणजे, 31 डिसेंबर 2019 रोजी Jagsonpal Pharmaceuticals या कंपनीच्या एका शेअरची किंमत 25.75 रुपये होती. जी आता वाढून 371.50 रुपयांवर पोहोचली होती. अर्थात, तेव्हापासून आतापर्यंत Jagsonpal Pharmaceuticals च्या शेअरने 1342.71 टक्क्यांची उसळी घेतली आहे.

3. - Dynacons Systems & Solutions ही कंपनीही परतावा देण्याच्या बाबतीत मागे नाही. गेल्या 3 महिन्यांदरम्यान पोजीशनल गुंतवणूकदारांना कंपनीने 1303 टक्क्यांपर्यंतचा परतावा दिला आहे. या कंपनीच्या शेअर्समध्ये 2022 दरम्यान 114.55 टक्क्यांपर्यंतची तेजी दिसून आली आहे. तसेच, 2021 मध्ये कंपनी कंपनीच्या शेअरचा भाव 149.46 टक्के वाढला होता.

4. - बम्पर परतावा देणाऱ्या कंपन्यांच्या यादीत अदानी समूहाच्या अदानी एंटरप्रायझेसचेही नाव आहे. गेल्या तीन वर्षांत या कंपनीच्या शेअरची किंमत 1755.90 टक्क्यांनी वाढली आहे. 2022 मध्ये अदानी एंटरप्रायझेसने आपल्या पोझिशनल गुंतवणूकदारांना 125.88 टक्कांपर्यंतचा परतावा दिला आहे.

5. - ग्लोब कॅपिटल मार्केटनेही जबरदस्त परतावा देत आल्या गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. कंपनीच्या शेअरच्या किंमतीत गेल्या दिव वर्षांत 6410 टक्क्यांची तेजी दिसून आली आहे. या कंपनीने गेल्या वर्षी स्टॉक मार्केटमध्ये पोझिशनल गुंतवणूकदारांना 567.73 टक्क्यांपर्यंतचा परतावा दिला होता.

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)