Multibagger Share : १ रुपयांची गुंतवणूक झाली ५८०००, 'या' शेअरनं अनेकांना बनवलं कोट्यधीश

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2023 08:10 PM2023-02-21T20:10:02+5:302023-02-21T20:17:36+5:30

टाटा समूहाच्या कंपन्यांच्या उत्पादनांना बाजारात मागणी तर आहेच, पण त्यांचे शेअर्सही प्रचंड परतावा देतात.

कोट्यधीश होण्यासाठी आयुष्यभर वाट पहावी लागत नाही. कधीकधी योग्य वेळी घेतलेला तुमचा एक निर्णयही तुम्हाला अल्पावधीत तुम्हाला कोट्यधीश बनवू शकतो.

आता टाटा ग्रुपची ही कंपनी जेव्हा लिस्ट झाली तेव्हा तुम्ही त्यात गुंतवणूक केली असती तर आज तुम्हाला एक-दोन टक्के नव्हे तर 58 हजार टक्क्यांहून अधिक परतावा मिळाला असता. म्हणजे तुमची 1 रुपयांची गुंतवणूक आज 58,000 रुपये इतकी झाली असती.

आम्ही टायटन कंपनीबद्दल बोलत आहोत, ज्याचे 1 रुपये फेस व्हॅल्यू असलेल्या शेअर्सची किंमत 1 जानेवारी 1999 रोजी फक्त 4.27 रुपये होती. आता त्याचे मूल्य 2,500 रुपयांपेक्षा जास्त झाले आहे.

टायटन ब्रँड अंतर्गत घड्याळे आणि तनिष्क ब्रँड अंतर्गत दागिन्यांचा व्यापार करणाऱ्या या टाटा समूहाच्या कंपनीचा स्टॉक गेल्या 23 वर्षांत 58,000 टक्क्यांहून अधिक वाढला आहे. त्याच वेळी, त्याने या शेअरने आजवरची 2791 रुपयांची पातळी गाठली आहे.

तुम्ही 1999 मध्ये टाटा समूहाच्या या कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते तर तुम्हाला 25,000 शेअर्स मिळाले असते. सध्याचा शेअर बाजारातील चढ-उतार पाहता या शेअरची किंमत जरी 2500 रुपये ठरवली तरी या शेअरची किंमत 6,25,00,000 रुपये झाली असती. म्हणजे फक्त 1 लाख रुपयांच्या गुंतवणुकीत तुम्ही आज कोट्यधीश झाला असता.

शेअर बाजारातील 'बिग बुल' म्हणून ओळखले जाणारे दिवंगत राकेश झुनझुनवाला आणि त्यांची पत्नी रेखा झुनझुनवाला यांनी टायटन कंपनीत गुंतवणूक आहे. सध्या, रेखा झुनझुनवाला यांच्याकडे डिसेंबर 2022 पर्यंत टायटन कंपनीचे 4,58,95,970 शेअर्स होते, जे कंपनीतील सुमारे 5.17 टक्के शेअर्सच्या समतुल्य आहे. अलीकडेच रेखा झुनझुनवाला यांनी या शेअर्समधून 1,000 कोटी रुपयांहून अधिक कमाई केली आहे.

या महिन्याच्या 2 तारखेला टायटनच्या शेअरची किंमत 2,310 रुपये होती. 16 फेब्रुवारीला त्याची किंमत 2,535 रुपयांवर पोहोचली. अशा प्रकारे, दोन आठवड्यांपेक्षा कमी कालावधीत, त्यांनी प्रति शेअर 225 रुपये कमावले.