मुकेश अंबानी यांनाही अपयशाचा सामना करावा लागला; त्यांचे 'हे' व्यवसाय झाले कायमचे बंद...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2025 17:27 IST2025-05-25T17:25:19+5:302025-05-25T17:27:55+5:30
Mukesh Amabni: असे कोणतेही क्षेत्र नाही, ज्यात अंबानींचा प्रभाव नाही. पण असे काही व्यवसाय आहेत, ज्यात मुकेश अंबानी यांना अपयशाचा सामना करावा लागला आहे.

Mukesh Amabni: मुकेश अंबानी हे केवळ भारतातील नव्हे, तर आशियातील सर्वात यशस्वी आणि क्रमांक एकचे श्रीमंत उद्योजक आहेत. त्यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजने ऊर्जा, दूरसंचार आणि किरकोळ विक्रीसारख्या क्षेत्रात अभूतपूर्व यश मिळवले आहे. पण, त्यांच्या व्यावसायिक प्रवासात असेही काही प्रकल्प होते, ज्यांना अपेक्षित यश मिळाले नाही. यामध्ये रिलायन्स टाइमआउट, रिलायन्स ट्रेंड्स आणि रिलायन्स फ्रेश बाजारचा समावेश आहे.
रिलायन्स टाइमआउट-2008 मध्ये सुरू झालेले रिलायन्स टाइमआउट हे एक रिटेल स्टोअर होते, ज्यात पुस्तके, संगीत आणि स्टेशनरी उत्पादने विकली जायची. ग्राहकांना एकाच छताखाली विविध उत्पादनांची सुविधा उपलब्ध करून देणे, हा त्याचा उद्देश होता. पण, ऑनलाइन शॉपिंगचा वाढता ट्रेंड आणि ग्राहकांच्या बदलत्या पसंतींमुळे हे मॉडेल यशस्वी होऊ शकले नाही. अखेर 2012 मध्ये हे दुकान बंद करावे लागले.
रिलायन्स फ्रेश-'रिलायन्स फ्रेश' ला किराणा आणि दैनंदिन गरजांच्या क्षेत्रातील एक प्रमुख प्लेअर बनवणे, हा यामागील उद्देश होता. सुरुवातीच्या टप्प्यात ग्राहकांना आकर्षित करण्यात ते यशस्वी झाले असले तरी, कालांतराने त्याला अपेक्षित यश मिळाले नाही. बाजारातील स्पर्धा आणि ऑपरेशनल आव्हानांमुळे, 'रिलायन्स रिटेल' अंतर्गत त्याची पुनर्रचना करण्यात आली.
रिलायन्स ट्रेंड्स-'रिलायन्स ट्रेंड्स' हे एक कपड्यांच्या किरकोळ विक्रीचे नेटवर्क होते. हे सध्या पूर्णपणे बंद झाले नसले तरी, त्याचे अनेक स्टोअर बंद करावे लागले आहेत. गेल्या वर्षी कंपनीने 'सेंट्रो' स्टोअर्स तात्पुरते बंद करण्याची घोषणा केली होती. बाजारपेठेतील तीव्र स्पर्धा आणि ग्राहकांच्या बदलत्या पसंतींमुळे या ब्रँडच्या यशात अडथळा निर्माण झाला.
मुकेश अंबानी ज्या व्यवसायात हात घातला आहे, त्याचे सोने केले आहे. जिओपासून ते कॅम्पापर्यंत...याची जिवंत उदाहरणे आहेत. पण मुकेश अंबानींच्या व्यावसायिक प्रवासातील या अपयशांवरून हे स्पष्ट होते की, प्रत्येक नवीन प्रयत्न यशाची हमी देत नाही. या अनुभवांमधून शिकल्याने त्यांचा व्यवसाय दृष्टिकोन नक्कीच मजबूत झाला आहे.