Prithvi Ambani : छोट्या अंबानीचा वाढदिवस थाटात साजरा; आजोबा मुकेश अंबानींनी केले 'ग्रॅंड पार्टी'चे आयोजन

By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2023 09:29 AM2023-01-03T09:29:24+5:302023-01-03T09:37:17+5:30

रिलायन्स इंडस्ट्रीजचे संचालक मुकेश अंबानी यांचा नातू पृथ्वी अंबानी २ वर्षांचा झाला. मुंबईतल्या जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये ज्युनिअर अंबानीचा वाढदिवस जोरदार साजरा करण्यात आला. आकाश अंबानी आणि श्लोका अंबानी एकत्र मुलाला घेऊन जिओ सेंटरमध्ये पोहोचले.

१० डिसेंबर २०२० रोजी आकाश अंबानी आणि श्लोका अंबानी यांनी मुलाला जन्म दिला. पृथ्वीच्या २ ऱ्या वाढदिवसाची जंगी पार्टी आयोचित करण्यात आली होती. यावेळी श्लोका अंबानी आणि आकाश अंबानी यांनी ज्युनिअर अंबानीसह माध्यमांना पोझ दिली.

पृथ्वी अंबानीच्या बर्थडे पार्टीची थीम वंडरलॅंड अशी होती. जिओ गार्डनच्या एंट्री गेटवर वंडरलॅंड लिहिले होते. फुगे, कार्टुन्स ने परिसर सजवला होता.

पार्टीत मुकेश अंबानी आणि आकाश अंबानी या बापलेकांनी एकत्र येत माध्यमांना पोझ दिली. आकाश अंबानी स्वत: वडिल मुकेश अंबानी यांनी घ्यायला कारजवळ आले.

पार्टीत करण जोहरने आपल्या दोन्ही मुलांसह हजेरी लावली. करणची जुळी मुलं यश जोहर आणि रुही जोहर यांनी करणसोबत माध्यमांसमोर आले. दोघांनी वंडरलॅंडच्या थीमसंबंधित आऊटफिट घातलेले दिसले.

ब्रम्हास्त्र दिग्दर्शक अयान मुखर्जी देखीस एकटाच पार्टीत आलेला दिसला. निळ्या रंगाचा टीशर्ट आणि ग्रे जीन्स या आऊटफिटमध्ये तो जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये दाखल झाला.

भारतीय क्रिकेटपटू कृणाल पांड्या देखील आपल्या कुटुंबासह पार्टीत आला होता. कृणालचा मुलगा आणि पत्नी त्याच्यासोबत होती. तसेच त्यांच्यासोबत हार्दिकची पत्नी नताशा देखील होती.

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माची पत्नी रितिका मुलगी समायरासह पार्टीत पोहोचली.यावेळी रितिका टॉप आणि शॉट्स मध्ये पोहोचली आणि रितिका क्युट निळ्या रंगाच्या फ्रॉकमध्ये आली होती.