मुकेश अंबानी 7 जुलैला करणार मोठा धमाका, 2.5 कोटी 2G ग्राहकांना मिळणार फायदा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2023 02:07 PM2023-07-04T14:07:05+5:302023-07-04T14:11:25+5:30

मुकेश अंबानी यांनी लॉन्च केला सर्वात स्वस्त 4G फोन, किंमत फक्त 999...

काही महिन्यांपूर्वी भारतात 5G सेवा सुरू झाली, पण जगाशी स्पर्धा करण्यासाठी भारताने 6G तंत्रज्ञानावर काम सुरू केले आहे. पण, देशात सुमारे 2.5 कोटी लोक अजूनही 2G तंत्रज्ञान वापरत आहेत.

उद्योगपती मुकेश अंबानी यांनी अशा लोकांना 2G मधून 4G च्या जगात आणण्याची योजना आखली आहे. मुकेश अंबानींच्या रिलायन्स जिओने 'Jio Bharat V2' लॉन्च केला आहे. त्याची चाचणी 7 जुलैपासून सुरू होणार आहे.

'Jio Bharat V2' ची किंमत फक्त 999 रुपये ठेवण्यात आली आहे. हा भारतीय बाजारातील इंटरनेट इनबिल्ड सर्वात स्वस्त फीचर फोन आहे. या फोनच्या माध्यमातून कंपनी देशातील अशा 2.5 कोटी लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे, जे अजूनही 2G फीचर फोन वापरतात.

त्यांना स्वस्तात 4G फोन उपलब्ध करून देणे, हे कंपनीचे उद्दीष्ट आहे. सामान्य लोकांपर्यंत पोहचण्यासाठी मुकेश अंबानी यांनी 30 टक्क्यांपर्यंत स्वस्त मासिक रिचार्ज प्लॅन्स आणले आहेत. या प्लॅनमध्ये ग्राहकांना कमी पैशात सातपट जास्त इंटरनेट मिळेल. 'Jio Bharat V2' फोनचा मासिक प्लॅन 123 रुपयांपासून सुरू होईल.

यामध्ये 14 जीबी डेटा मिळेल. बाजारातील इतर ऑपरेटरच्या प्लॅनपेक्षा हा खूपच स्वस्त आहे. इतर ऑपरेटर 2 GB इंटरनेट सुमारे रु 179 प्रति महिना शुल्क आकारतात.

'Jio Bharat V2' सामान्य लोकांना UPI पेमेंट सुविधा देईल. फोनमध्ये जिओ-पे अॅप आधीपासूनच इन्स्टॉल असेल, याद्वारे लोक UPI पेमेंट करू शकतील.

याशिवाय लोकांना 'जिओ सिनेमा' अॅपद्वारे OTT कंटेंट पाहण्याची सुविधा आणि 'जिओ सावन' अॅपवर गाणी ऐकण्याची सुविधा असेल. फोनमध्ये 1000 mAh बॅटरी मिळेल, तर 1.77-इंचाचा QVGA TFT डिस्प्ले असेल.

मात्र, हा फोन फक्त जिओच्या सिमसोबत काम करेल. फोनमध्ये टॉर्च लाइट, एफएम रेडिओ, 3.5 मिमी हेडफोन जॅक आणि 0.3 मेगापिक्सेल कॅमेरा यांसारखी इतर फीचर आहेत. या फोनमध्ये 128 GB पर्यंतची एक्स्पांडेबल मेमरी असेल.