पैशांसाठी कुणावरही अवलंबून राहू नये असं वाटतं? मग आजपासून 'या' १० टीप्स फोलो करा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2025 14:08 IST2025-05-11T14:05:01+5:302025-05-11T14:08:13+5:30
Mother’s Day Special : महिलांनी त्यांच्या दीर्घकालीन आर्थिक सुरक्षेचा विचार केला पाहिजे. आज जागतिक मातृदिनानिमित्त आपल्या आर्थिक स्वातंत्र्यांच्या दिशेने पहिलं पाऊल टाकायला हरकत नाही.

आज जागतिक मातृदिन आहे. जागतिक मातृदिन हा दिवस जगभरातील माता आणि मातृत्वाचा सन्मान करण्यासाठी साजरा केला जातो. कुटुंबाची काळजी घेताना बहुसंख्या महिला आपल्या आर्थिक स्वातंत्र्याकडे दुर्लक्ष करतात. भविष्यात पैशांसाठी कोणाकडेही हात पसरावे लागू नये असं वाटत असेल तर आतापासूनच सुरुवात करायला हवी.
माझ्याकडे जास्त पैसे आल्यानंतर मी बचत सुरू करेल असा विचार करू नका. तुमचे उत्पन्न कमी असले तरी थोडी बचत आजपासूनच सुरू करा. जर तुम्ही कमावत नसाल तर पतीकडून तुमच्या नावावर बचत करण्यास सांगा.
आपत्कालीन निधी : आयुष्य हे अनपेक्षित घटनांनी भरलेले आहे. कधी काय होईल सांगता येत नाही. त्यामुळे संकटसयमी तुमच्याकडे पैसे असणे आवश्यक आहे. तुमच्या आर्थिक उद्दिष्टांशी तडजोड न करता अनपेक्षित खर्च पूर्ण करू शकेल असा आपत्कालीन निधी तयार करा.
तुमची क्षमता आणि आवड ओळखा : मातांनी त्यांच्या प्रतिभेचा आणि छंदांचा फायदा घेतला पाहिजे. तुमच्या वैयक्तिक विकासावर लक्ष केंद्रित करा आणि तुमची आर्थिक स्थिती मजबूत करा.
आर्थिक बजेट महत्त्वाचं : कुटुंबाचे आर्थिक नियोजन करण्याची जबाबदारी तुमच्याकडे घ्या. यासाठी आवश्यक ती कौशल्य आत्मसात कराल.
दीर्घकालीन आर्थिक सुरक्षा : मातांनी त्यांच्या दीर्घकालीन आर्थिक सुरक्षेचा विचार केला पाहिजे. त्यासाठी योजना आखल्या पाहिजेत. गुंतवणूक आणि निवृत्तीचे नियोजन लवकर करा. आजकाल तुम्ही फक्त एका क्लिकवर तुमचा प्लॅन बनवू शकता.
आर्थिक ध्येय निश्चित करा : विशिष्ट पैशाचे ध्येय निश्चित करा आणि ते साध्य करण्यासाठी स्पष्ट रणनीती बनवा. विशिष्ट ध्येय असल्याने बचतीसाठी प्रेरणा आणि शिस्त तयार होते.
आरोग्य आणि जीवन विमा : स्वतःचे आणि तुमच्या कुटुंबाचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी, आरोग्य आणि जीवन विमा असायलाच हवा. इथे तडजोड करुन उपयोग नाही.
निवृत्तीसाठी गुंतवणूक करा : तुमच्या निवृत्ती योजनेसाठी गुंतवणूक सुरू करा. यासाठी तुम्ही म्युच्युअल फंडांमध्येही गुंतवणूक करू शकता.
दीर्घकालीन गुंतवणूक : दीर्घकालीन गुंतवणूक पर्यायांचा विचार करा. शेअर बाजारातील जास्त माहिती नसल्यास म्युच्युअल फंडात एसआयपीद्वारे गुंतवणूक करू शकता. पण, अशा ठिकाणी गुंतवणूक करताना तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.
तुमच्या मुलांना अर्थसाक्षर करा : लहानपणापासूनच तुमच्या मुलांना पैशाचे महत्त्व आणि त्याचे व्यवस्थापन शिकवायला सुरुवात करा. आर्थिक साक्षरतेला वय नसते.