मोदी सरकारची महिलांसाठी जबरदस्त योजना! कमी व्याजावर मिळणार दोन लाखांपर्यंत कर्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2023 02:59 PM2023-12-21T14:59:11+5:302023-12-21T15:03:45+5:30

महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी केंद्र सरकारने नवीन स्वर्णिमा कर्ज योजना आणली आहे.

केंद्र सरकार आणि राज्य सरकारे वेळोवेळी देशातील प्रत्येक घटकासाठी विविध योजना आणतात. अलीकडेच मोदी सरकारने महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी विशेष योजना सुरू केली आहे. नवीन स्वर्णिमा कर्ज योजना असे या योजनेचे नाव आहे.

ही योजना नॅशनल बॅकवर्ड क्लासेस फायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने सुरू केली आहे, ज्याचा उद्देश मागासवर्गीय महिलांना स्वावलंबी बनवणे हा आहे.

या योजनेंतर्गत, सरकार ३ लाख रुपयांपर्यंत वार्षिक कौटुंबिक उत्पन्न असलेल्या महिलांना जास्तीत जास्त २ लाख रुपयांचे कर्ज देत आहे.

या कर्जावर सरकार दरवर्षी ५ टक्के व्याज आकारत आहे, जे सामान्य व्याजदरापेक्षा खूपच कमी आहे.

तुम्हाला या कर्जाचा EMI प्रत्येक महिन्याऐवजी दर तीन महिन्यांनी भरावा लागेल.

तुम्ही ८ वर्षांच्या कालावधीत कर्जाची रक्कम परत करू शकता. योजनेशी संबंधित अधिक माहिती मिळविण्यासाठी, तुम्ही त्याचा टोल फ्री क्रमांक १८००१०२३३९९ किंवा www.nbcfdc.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता.

या कर्जाच्या माध्यमातून मागासवर्गीय महिला आपला लघुउद्योग सुरू करू शकतात. याशिवाय शिक्षण इत्यादी खर्चासाठीही हे कर्ज घेता येते. योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदार ओळखपत्र, जात प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी प्रमाणपत्र यांसारखी कागदपत्रे असणे आवश्यक आहे.