Smartphone Production : देशात स्मार्टफोनच्या उत्पादनात ५० टक्क्यांची घट; 'हे' आहे प्रमुख कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2021 02:23 PM2021-05-12T14:23:30+5:302021-05-12T14:35:42+5:30

एप्रिल आणि मे महिन्यात स्मार्टफोनच्या उत्पादनात आणि विक्रीत नोंदवली गेली मोठी घट.

स्थानिक लॉकडाऊन, सेमीकंडक्टर्सची टंचाई आणि कारखान्यातील कामगारांमधील कोरोना संक्रमणामुळे एप्रिल आणि मे महिन्यामध्ये स्मार्टफोन फोन उत्पादन आणि विक्रीत मोठी घट झाली आहे.

यामुळे एप्रिल ते जून हा तिमाही या कंपन्यांसाठी आव्हानात्मक झाला आहे. अनेक मोबाइल फोन कंपन्यांच्या प्रमुखांनी याबाबत सांगितलं.

तसंच लावा इंटरनॅशनलचे सह-संस्थापक एस.एन. राय आणि मायक्रोमॅक्सचे सहसंस्थापक राजेश अग्रवाल यांनी कबूल केलं की देशभरात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत असताना एप्रिल-मे महिन्यामध्ये स्मार्टफोनच्या उत्पादनामध्ये जवळपास ५ टक्क्यांनी घट झाली आहे.

"जूनच्या तिमाहीत परिस्थिती खरोखरच आव्हानात्मक आहे," असं राय यांनी नमूद केलं.

आमच्यासारख्या काही कंपन्या एप्रिलमध्ये उत्पादन सुरू ठेवू शकल्या कारण आमच्याकडे स्पेअर पार्ट्सचा काहीसा साठा होता. परंतु सर्व कंपन्यांमध्ये असे नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

मे महिन्यात संक्रमणाची वाढ झाल्यानं आणि लॉकडाऊन लागल्यामुळे सर्वांसाठी वाईट झाला होता. उद्योगाबद्दल बोलायचे झाले तर व्यवसायात जवळपास ५ टक्के तोटा झाल्याचंही त्यांनी नमूद केलं.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे फॉक्सकॉनच्या चेन्नई येथील प्रकल्पातही आयफोनचं उत्पादन कंपनीनं ५० टक्क्यांनी कमी केल्याचं रॉयटर्सनं आज सूत्रांच्या हवाल्यानं म्हटलं आहे.

फॉक्सकॉन ही कंपनी भारतात अॅपल आयफोनचं उत्पादन करते. तसंच ही कंपनी शाओमीसाठीही स्मार्टफोन निर्मितीचं काम करते.

रिसर्च फर्म आयडीसीच्या म्हणण्यानुसार, फेब्रुवारीच्या दुसर्‍या पंधरवड्यात स्मार्टफोनची खेप कमी होऊ लागली.

पण कंपन्यांनी सांगितलं की मार्च तिमाही त्यांच्यासाठी चांगली होता. परंतु गेल्या वर्षी मार्चमध्ये विक्री कमी झाल्यामुळेही हे झालं होतं.

आयडीसीच्या आकडेवारीनुसार, जानेवारी ते मार्च २०२१ दरम्यान स्मार्टफोन कंपन्यांकडून डिसेंबर तिमाहीत १४ टक्के कमी स्मार्टफोन आले.

परंतु गेल्या वर्षी जानेवारी-मार्चच्या तुलनेत त्यात १८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. जून तिमाहीत उत्पादन कमी होईल असंही कंपन्यांचं म्हणणं आहे.

सध्या परिस्थिती आव्हानात्मक असल्यामुळे जून तिमाही कंपन्यांसाठी कठीण होणार आहे, असं मायक्रोमॅक्सचे अग्रवाल म्हणाले.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे खरेदीदारांनीही याकडे पाठ फिरवली आहे. लॉकडाऊन हटवल्यानंतर यामध्ये हळूहळू सुधारणा होऊ शकते, असंही त्यांनी नमूद केलं.

२०२१ या कॅलेंडर वर्षात पूर्वीच्या अपेक्षेइतके सुधारणा होणार नाही. दुसर्‍या लाटेचा प्रभाव आणि तिसर्‍या लाटाचा भय बराच काळ टिकू शकेल, असं आयडीसी इंडियाचे संशोधन विभागाचे संचालक नवकेंद्र सिंग म्हणाले.

२०२१ मध्ये स्मार्टफोन बाजाराची वार्षिक वाढ एकाच अंकात होईल. पहिल्यांदा दोन अंकात ही वाढ होईल असा अंदाज वर्तवण्यात आला होता असंही त्यांनी सांगितलं.

अनावश्यक खर्च कमी करणे, पुरवठा साखळीवरील दबाव आणि भागांच्या किंमतीत वाढ होणे अपेक्षित असून त्यामुळे येणाऱ्या तिमाहींमध्ये दबाव वाढू शकणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.

लॉकडाऊन हटवल्यानंतर दोन तीन आठवडेही उत्साह कमीचं असेल. परंतु उत्पादन सुरू होऊ शकतं. परंतु उत्तम सुधारणांसाठी कागी महिने प्रतीक्षा करावी लागू शकते, असंही सिंग म्हणाले.