कंपनी हवी तर अशी!, कर्मचाऱ्यांना देतेय बंपर सुट्ट्या; वर्क ब्रेक, महिला दिन, व्हॅलेंटाईन डेचीही मिळणार सुट्टी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2021 04:37 PM2021-09-05T16:37:42+5:302021-09-05T16:43:24+5:30

कंपनीनं आपल्या कर्मचाऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. या अंतर्गत कर्मचाऱ्यांना नोव्हेंबर महिन्यात सणासुदीनंतर कर्मचाऱ्यांना आराम करण्यासाठी सुट्टी देण्यात येणार आहे. कर्मचाऱ्यांना ६४ ऑप्शनल हॉलीडे.

सोशल कॉमर्स प्लॅटफॉर्म Meesho नं आपल्या कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी घोषणा केली आहे. कंपनीनं या वर्षी आपल्या कर्मचाऱ्यांना या सणाणुदीच्या काळानंतर १० दिवसांचा ब्रेक देण्याची घोषणा केली आहे. जेणेकरून सणासुदीच्या कालावधीत कर्मचाऱ्यांवर असलेला ताण होऊन पुन्हा ते जोमानं कामाला लागू शकतील असं कंपनीचं म्हणणं आहे.

एका लिंक्डिन पोस्टवर याची घोषणा करताना Meesho नं म्हटलं आहे की, कंपनी ४ नोव्हेंबर ते १४ नोव्हेंबर या कालावधीत काम करणार नाही, जेणेकरून सणासुदीच्या कालावधीतील ताण कमी करून पुन्हा नव्या जोमानं कामावर परतू शकतील.

या दहा दिवसांखेरीज कर्मचाऱ्यांना केवळ वीकेंड किंवा सणांच्या दिवशीच सुट्टी मिळेल असं नाही. Meesho काम करणाऱ्या लोकांना ६४ पर्यायी सुट्ट्यांचं कॅलेंडर देण्यात आलं आहे. त्यात महिला दिन, पुस्तक प्रेमी दिवस आणि व्हॅलेंटाईन डे सारखे विशेष दिवस देखील समाविष्ट आहेत.

कोरोना महासाथीच्या कालावधीत लोकांचं मानसिक आरोग्य आणि त्यांच्या कामावर अधिक परिणाम झाला आहे हे कंपनी जाणते असं त्यांनी म्हटलं आहे. तसंच दुसऱ्या एका पोस्टमध्ये कंपनीनं ऑप्शनल सुट्ट्यांची संख्या अपडेट केल्याचं म्हटलं आहे.

आता प्रत्येक कर्मचाऱ्यांना ६४ दिवसांच्या ऑप्शनल सुट्ट्या मिळतीस. यामध्ये सणासुदीच्या वेळी असलेल्या सुट्ट्यांव्यतिरिक्त महिला दिन, बुक लव्हर्स डे आणि व्हॅलेंटाईन डे सारत्या सुट्ट्याही असतील असं कंपनीनं म्हटलं आहे.

मीशो अॅप 2015 मध्ये आयआयटी दिल्लीचे दोन वर्गमित्र विदित अत्रे आणि संजीव बर्नवाल यांनी सुरू केलं होतं. हे उत्पादकांना पुनर्विक्रेतांशी जोडण्यासाठी एक व्यासपीठ प्रदान करतं. हे ग्राहक व्हॉट्सअॅप आणि फेसबुक सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे अंतिम ग्राहकाला उत्पादन विकतात.

याचं मुख्यालय बंगळुरूमध्ये आहे आणि पुनर्विक्रेतांना त्यांचे व्यवहार आणि विक्रीमध्ये मदत करण्यासाठी त्यांना पेमेंट आणि लॉजिस्टिक सेवादेखील पुरवते. कंपनी देशातील ५ हजार शहरांमध्ये सुमारे एक कोटी पुनर्विक्रेतांना आपली सेवा पुरवते.