भारताशी पंगा Maldives ला पडतोय महागात; दररोज इतक्या कोटींचं मोठं नुकसान, कोणीच जायला तयार नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2024 08:26 AM2024-01-17T08:26:36+5:302024-01-17T08:50:56+5:30

भारताशी पंगा घेणे मालदीवला महागात पडलं आहे. मालदीवला आता मोठा धक्का बसलाय.

भारताशी पंगा घेणे मालदीवला महागात पडलं आहे. मालदीवला आता मोठा धक्का बसलाय. मालदीववर बहिष्काराचा (boycott maldives) परिणाम आता मालदीववर दिसूनही येतोय. भारताच्या बहिष्कारामुळे मालदीवला (maldives vs lakshadweep) दररोज कोट्यवधी रुपयांचं नुकसान होतंय.

मालदीवचा महसूल पर्यटक आणि पर्यटनावर सर्वाधिक अवलंबून आहे. अशा परिस्थितीत बहिष्कारामुळे त्यांच्या कमाईचं आता मोठं नुकसान होत आहे. परिस्थिती हाताळण्यासाठी मालदीवने तेथील प्रवासाचा खर्च निम्म्यावर आणला आहे, मात्र त्यानंतरही भारतीय तेथे जाण्यास तयार नाहीत.

मालदीव सरकारच्या काही अधिकाऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लक्षद्वीप दौऱ्याबाबत आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. तेव्हापासून मालदीववर बहिष्काराचा ट्रेंड सुरू झाला आहे. भारताच्या बहिष्कारामुळं मालदीवचं दररोज कोट्यवधी रुपयांचं नुकसान होत आहे.

मालदीवला याचा मोठा आर्थिक फटका बसला आहे. या संपूर्ण घटनेपूर्वी मालदीव हे भारतीयांचं आवडतं पर्यटन स्थळ होते. दरवर्षी लाखो भारतीय मालदीवला भेट देतात, मात्र भारतीयांनी बहिष्कार टाकल्यामुळे ४४ हजार कुटुंबं संकटात सापडल्याचं मालदीवनेच सांगितलं आहे. भारतीयांच्या नाराजीमुळे त्यांच्या पर्यटन उद्योगावर मोठा परिणाम झालाय.

या वादानंतर मालदीवला दररोज महसुलाचं मोठं नुकसान होत आहे. गेल्या वर्षी म्हणजे २०२३ मध्ये मोठ्या संख्येने भारतीय मालदीवला भेट देण्यासाठी गेले होते. गेल्या वर्षी, केवळ भारतीयांनी मालदीवमध्ये ३८ कोटी डॉलर्स (सुमारे ३,१५२ कोटी रुपये) खर्च केले. अशा परिस्थितीत भारतीयांनी तिथे जाणे बंद केलं तर मालदीवचं दररोज किमान ८.६ कोटी रुपयांचे नुकसान होऊ शकते.

लक्षद्वीपवर दौऱ्यादरम्यानचे फोटो सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर मालदीवच्या मंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टिपण्णी केली होती. यानंतर भारतातील सर्व बड्या सेलिब्रिटींनी आणि केंद्रीय मंत्र्यांनी याला विरोध दर्शवला होता. यानंतर मालदीवच्या मंत्र्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. या घटनेनंतर आता भारतीयांनी मालदीवमध्ये जाण्यावर बहिष्कार टाकला आहे.

मालदीवच्या नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (PM Modi) वादग्रस्त टिप्पणी केल्यानंतर #BoycottMaldives ट्रेंड करत आहे. तर यानंतर मालदीवच्या (Maldives) समस्या वाढल्या आहेत. यानंतर EaseMyTrip नं देखील मालदीवला मोठा धक्का दिला. EaseMyTrip नं मालदीवसाठी सर्व फ्लाइट बुकिंग रद्द केले. या ट्रॅव्हल कंपनीचे सीईओ आणि सह-संस्थापक निशांत पिट्टी यांनी ही माहिती दिली होती.