LIC Child Plans: मुलांच्या सुरक्षित भविष्यासाठी LIC चे तीन बेस्ट प्लॅन; तिसरा तुमच्यासाठीही घेता येईल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2021 06:08 PM2021-07-29T18:08:09+5:302021-07-29T18:14:28+5:30

LIC's best plans for Children's: जर तुम्हाला तुमच्या पाल्याच्या भविष्यासाठी एलआयसीची चाईल्ड पॉलिसी घ्यायची असेल तर आम्ही तुम्हाला LIC च्या तीन बेस्ट चाईल्ड पॉलिसी प्लॅनबाबत सांगणार आहोत. यामुळे तुम्हाला योग्य पॉलिसी निवडताना मदत होईल.

LIC Child Plans: बदलत्या काळानुसार पालक त्यांच्या मुलांच्या भविष्याचा विचार करू लागले आहेत. शैक्षणिक सोबत आर्थिक भविष्यही चांगले रहावे, असा त्यांचा प्रयत्न असतो. यासाठी एलआयसीने तीन चाईल्ड प्लॅन (Child Plans) आणले आहेत. (LIC's three child Plans for there secure future)

लहानपणापासूनच पैसे या योजनांमध्ये गुंतविले तर भविष्यात कॉलेजच्या प्रवेशावेळी, उद्योगधंदा उघडून देण्यावेळी किंवा लग्नावेळी हा पैसा उपयोगी पडणार आहे.

जर तुम्हाला तुमच्या पाल्याच्या भविष्यासाठी एलआयसीची चाईल्ड पॉलिसी घ्यायची असेल तर आम्ही तुम्हाला LIC च्या तीन बेस्ट चाईल्ड पॉलिसी प्लॅनबाबत सांगणार आहोत. यामुळे तुम्हाला योग्य पॉलिसी निवडताना मदत होईल.

या प्लॅनमध्ये तीनवेळा मनी बॅक मिळतो. जेव्हा मूल 18 वर्षांचे होते तेव्हा सम अश्युअर्डच्या 20 टक्के, 20 वर्षे झाल्यावर पुन्हा 20 टक्के आणि तिसऱ्यांदा 22 वर्षांचे झाले की 20 टक्के मिळतो. यानंतर मूल 25 वर्षांचे झाल्यावर पॉलिसी मॅच्युअर होते.

तेव्हा उरलेले 40 टक्के आणि बोनस मिळतो. जर तुम्हाला मध्ये पैसे नको असतील तर मॅच्युरिटीनंतर घ्यायचा पर्याय आहे. हा विमा घेण्यासाठी वय 0 ते 12 वर्षे अशी अट आहे. कमीतकमी 10000 रुपयांचा विमा काढता येतो.

जीवन तरुण योजना एक नॉन-लिंक्ड, प्रॉफिट शेयर करणारी सीमित प्रमिअम पॉलिसी आहे. एका मुलाच्या सुरक्षित भविष्याचे आणि बचतीचे मिश्रण आहे. ही पॉलिसी 0 ते 12 वर्षांच्या मुलांसाठी आहे.

चार प्रकार आहेत. यानुसार तुम्ही 20 वर्षे झाली की 5, 10, 50 टक्के आणि 25 व्या वर्षी मॅच्युरिटीचे पैसे असे निवडू शकता. कमीतकमी अश्युअर्ड रक्कम 75 हजार रुपये आहे. ही पॉलिसी मुलांच्या नावावर घेता येते.

ही पॉलिसी पालकांच्या नावावर घेऊन नॉमिनी म्हणून मुलाला ठेवता येते. यामध्ये 13 ते 25 वर्षांचा पॉलिसी पिरएड असतो. तुम्ही जेवढ्या वर्षांची पॉलिसी घ्याल त्याच्या 3 वर्षे कमी हप्ता भरावा लागणार आहे. प्रिमिअम वेवर बेनिफिट रायडर यामध्ये आहे.

विमाधारकाचा मृत्यू किंवा अपंगत्व आले तर नॉमिनी म्हणजेच मुलाला दर वर्षी अश्युअर्ड रकमेच्या 10 टक्के पैसे मिळत जातील. तसेच भविष्यातील सर्व हप्ते माफ होतील.

मॅच्युरिटी झाल्यावर अश्युअर्ड रकमेच्या 110 टक्के आणि बोनस दिला जातो. 18 ते 50 वर्षे वयाचे पालक ही पॉलिसी घेऊ शकतात. कमीतकमी १ लाखाची ही पॉलिसी आहे.