LG नं घेतला होता Smartphone बिझनेस बंद करण्याचा निर्णय; आता ग्राहकांसाठी केली मोठी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2021 09:22 AM2021-04-09T09:22:42+5:302021-04-09T09:29:48+5:30

LG Decides to close Smartphone unit: Sony कंपनीने दोन वर्षांपूवी भारतातील स्मार्टफोन बाजार गुंडाळला होता. चिनी कंपन्यांच्या कमी किंमती आणि आव्हानामुळे या मोठ्या कंपन्यांना व्यवसाय करणे कठीण जात होते.

इलेक्ट्रॉनिक्स इंडस्ट्रीतील बडी कंपनी एलजी (LG) मोबाईल बिझनेस (Mobile Business) युनिट बंद करणार आहे. स्मार्टफोनच्या बाजारात फारसा दम दाखवू न शकल्याने कंपनीने हा निर्णय घेतला आहे.

स्मार्टफोन विभाग बंद केल्याने कंपनीला इलेक्ट्रीक व्हेईकल कंपोनंट्स, आर्टिफिशल इंटेलिजेंस, कनेक्टेड डिव्हाइसेस, स्मार्ट होम्स, बिझनेस-टू-बिझनेस सोल्यूशन सारख्या बाजारावर लक्ष केंद्रीत करता येणार आहे. (LG Electronics decide to close Smartphone unit.)

कंपनी आपला स्टॉक संपविणार आहे. हे फोन संपेपर्यंत बाजारात उपलब्ध असतील. कंपनी या फोनसाठी एका ठराविक कालावधीपर्यंत ग्राहकांना सर्व्हिस सपोर्ट आणि सॉफ्टवेअर अपडेट देत राहणार असल्याची माहिती कंपनीनं दिली होती.

दरम्यान, आता LG नं आपल्या ग्राहकांसाठी मोठा दिलासा दिला आहे. तसंच अँड्रॉईड फोन युझर्ससाठी अपडेट्स देत राहणार असल्यातंही कंपनीनं म्हटलं आहे.

सध्या वापरात असलेल्या प्रीमिअम स्मार्टफोन्सच्या खरेदीपासून पुढील तीन वर्षांपर्यंत कंपनी अँड्रॉईडचे अपडेट्स देत राहणार असल्याची घोषणा LG नं केली.

जे प्रीमिअम अँड्रॉईड स्मार्टफोन्स आहेत जे २०१९ नंतर लाँच झाले आहेत. त्यांना हे अपडेट्स मिळत राहतील.

यामध्ये LG G सीरिज स्मार्टफोन्स, LG V सीरिज, LG Velvet आणि नुकताच लाँच करण्यात आलेल्या LG Wing चा समावेश असेल.

LG Stylo आणि LG K सीरिजचे स्मार्टफोन्स २०२० मध्ये लाँच झाले होते. या स्मार्टफोन्सनादेखील अपडेट मिळत राहणार असल्याचं कंपनीनं म्हटलं आहे.

LG च्या डायरेक्टर ऑफ बोर्डनं स्मार्टफोन बिझनेस बंद करण्यासाठी पूर्वीच परवानगी दिली होती. स्मार्टफोन व्यवसायात कंपनीला मोठं नुकसान सोसावं लागलं होतं.

सध्या LG आपल्या कर्मचाऱ्यांना स्मार्टफोन डिव्हिजनमधून दुसऱ्या युनिट्समध्ये ट्रान्सफर करत आहे. तसंच कंपनी आपला अन्य व्यवसाय अधिक मजबूत करण्यावर लक्ष देत आहे.

LG चा स्मार्टफोन बिझनेस येत्या ३१ जुलैपर्यंत कायमचा बंद केला जाणार आहे. यासाठी कंपनीने काही तयारी देखील केली आहे.

या तारखेनंतर देखील काही स्मार्टफोन बाजारात उपलब्ध असतील परंतु नवीन फोनचे उत्पादन बंद झाल्याने विक्री झाल्यानंतर एलजीचा एकही फोन बाजारात नसेल असंही कंपनीनं सांगितलं.

काही महिन्यांपूर्वीच एलजीने याबाबत संकेत दिले होते. यावेळी स्मार्टफोन युनिटच्या विक्रीचादेखील पर्याय कंपनीने विचारात घेतला होता. एलजी इलेक्ट्रॉनिक्सने यासाठी गुगल, फेसबुक, फोक्सवॅगन आणि व्हिएतनामच्या बीन ग्रुपशी देखील चर्चा करत होती. मात्र, कंपनीला डील करण्यात अपयश आले.

एलजी कंपनीचा स्मार्टफोन बाजारातील हात काढून घेण्याचा निर्णय धक्कादायक नाही. कारण कंपनी २०१५ च्या दुसऱ्या तिमाहीपासून सलग २३ तिमाहीमध्ये तोट्यात गेली आहे.

एलजीनं २०२० मध्ये एकूण ६.५ दशलक्ष युनिट पाठविले होते आणि २०२० च्या तिसऱ्या तिमाहीत कंपनीचा ग्लोबल शेअर हा २ टक्के राहिला होता. सोनी कंपनीने दोन वर्षांपूवी भारतातील स्मार्टफोन बाजार गुंडाळला होता. चिनी कंपन्यांच्या कमी किंमती आणि आव्हानामुळे या मोठ्या कंपन्यांना व्यवसाय करणे कठीण जात होते.