महिन्याला ७० रूपयांपेक्षा कमी खर्च; मोफत कॉलिंगसोबत डेटाही देतेय Reliance Jio

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2021 03:36 PM2021-07-29T15:36:57+5:302021-07-29T15:38:56+5:30

सध्या Reliance Jio कडे अनेक प्लॅन्स आहेत. कंपनी अनेक उत्तोमत्तम ऑफर्स ग्राहकांसाठी घेऊन येत आहे.

सध्या रिलायन्स जिओ या कंपनीकडे अनेक उत्तमोत्तम प्लॅन्स आहे. रिलायन्स जिओच्या ग्राहकांना आपल्या डेटाच्या गरजेनुसार प्लॅन्स निवडण्याची मुभाही आहे.

परंतु रिलायन्स जिओचा मोठ्या कालावधीसाठी असलेल्या एक प्लॅन अतिशय खिशालाही परवडणारा आहे. यासाठी ग्राहकांना महिन्याला ७० रूपयांपेक्षाही कमी खर्च करावा लागतो.

हा रिलायन्स जिओ फोनचा प्लान असून याची किंमत ७४९ रूपये इतकी आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना ३३६ दिवसांची वैधता मिळते. म्हणजेच हा प्लान ११ महिने चालतो.

प्लानमध्ये तुम्ही अनलिमिटेड कॉलिंगचं बेनिफिटही घेऊ शकता. तसंच यासोबत एकूण २४ जीबी डेटा देण्यात येतो. या रिचार्ज प्लानमध्ये २८ दिवसांसाठी ५० एसएमएसचीही सुविधा देण्यात येते. याशिवाय जिओ अॅप्सचंही सबस्क्रिप्शन मिळतं.

रिलायन्स जिओच्या १८५ रूपयांच्या प्लॅनमध्ये बाय वन गेट वनचा फायदा मिळतो. म्हणजेच १८५ रूपयांच्या प्लॅनची वैधता २८ दिवस आहे. परंतु ऑफर अंतर्गत ती ५६ दिवसांची मिळते.

या प्लॅनमध्ये ग्राहकांना ११२ जीबी डेटा देण्यात येतो. तसंच कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगचा फायदाही मिळतो. यासोबत १०० एसएमएस पाठवण्याची सुविधाही मिळते. याशिवाय जिओ अॅप्सचं सबस्क्रीप्शनही मिळतं.