म्यूच्युअल फंड, बँक FD अन् PF मध्ये गुंतवलाय पैसा? असं जाणून घ्या, किती दिवसांत होईल डबल-ट्रिपल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2021 06:00 PM2021-08-17T18:00:34+5:302021-08-17T18:10:10+5:30

एक सोपा नियम आहे, ज्याच्या माध्यमाने आपल्याला आपला पैसा किती वेगाने वाढू शकतो, हे सहजपणे कळू शकेल. (In how much time the money invested in mutual funds PF and bank FD will double)

जेव्हा आपण एखाज्या योजनेत पैसे गुंतवता, तेव्हा ते पैसे किती दिवसांत डबल होतील? असा विचार आपल्या मनात नक्कीच येत असेल. आपण आपले पैसे योग्य ठिकाणी गुंतवले, तर ते मोठ्या प्रमाणावर वाढू शकतात. एवढेच नाही, तर चक्रवाढ व्याज मिळून ते दुप्पटच नाही, तर तिप्पटही होऊ शकतात. (know the rule, In how much time the money invested in mutual funds PF and bank FD will double or triple)

ही गोष्ट अगदी बोरोबर आहे, की पैसे दुप्पट अथवा तिप्पट होण्यासंदर्भातील गणित पूर्णपणे अचूक असू शकत नाही. मात्र, त्यावरून आपल्याला आपल्या गुंतवणुकीसंदर्भात एक आयडिया निश्चितपणे मिळू शकते. एक सोपा नियम आहे, ज्याच्या माध्यमाने आपल्याला आपला पैसा किती वेगाने वाढू शकतो, हे सहजपणे कळू शकेल.

हा नियम आहे, रूल ऑफ 72 आणि रूल ऑफ 114. गुंतवणुकीसंदर्भात निर्णय घेण्यासाठी आपण या नियमाचा वापर करू शकतात.

रूल ऑफ 72 - आपले पैसे दुप्पट होण्यासाठी किती वर्ष लागतील, हे आपल्याला हा नियम सांगेल. याचा फॉर्म्युला अगदी सोपा आहे. आपले पैसे दुप्पट होण्यासाठी किती वर्षं लागतील, हे जाणून घेण्यासाठी, प्लॅनच्या इंट्रेस्ट रेटने 72ला भागा. मात्र, यासाठी रिटर्नचा एक विशिष्ट दर असणे आवश्यक आहे.

एक सोपं उदाहरण - समजा, या महिन्यात आपण पब्लिक प्रोव्हिडंट फंड अर्थात PPF मध्ये 50,000 रुपये गुंतवले आणि पीपीएफवरील व्याजदर 7 टक्के एवढा आहे. आता 50,000 रुपयांचे 1 लाख रुपये होण्यासाठी लागणारा वेळ जाणून घेण्यासाठी 72ला व्याज दराने म्हणजेच 7 ने भागा (72/7). यानुसार, व्याज दर 7 टक्का असेल, तर आपले पैसे साधारणपणे 10.28 वर्षांत डबल होतील.

आपले पैसे तीनपट कसे होतील? आता, आपले पैसे तिप्पट होण्यासाठी किती वर्षं लागतील? हे जाणून घ्यायची आपली इच्छा असेल, तर आपल्याला रूल ऑफ 114चा वापर करावा लागेल. हा नियमही रूल ऑफ 72 प्रमाणेच काम करतो.

आपली गुतंवणुक तिप्पट होण्यासाठी किती वर्ष लागतील? हे जाणून घेण्यासाठी आपल्याला 114 ला व्याजदराने भागावे लागेल. यानुसार, वर गृहित धरलेला पीपीएफवरील व्याजदर 7 टक्के दराने 50,000 रुपयांचे 1,50,000 रुपये होण्यासाठी साधारणपणे 16.28 वर्षं लागतील.

वार्षिक रिटर्न्सवरच लागू होतो हा नियम - महत्वाचे म्हणजे, नियम 72 हा केवळ वार्षिक रिटर्न्सच्या आधारावरच लागू आहे. त्यामुळे, इतर प्रकारच्या चक्रवाढ व्याजाचा अंदाज लावण्यासाठी या नियमाचा वापर केल्यास, आपल्याला अचूक आकडा मिळणार नाही.