रायली रुसोने फिफ्टी मारून बॅट उंचावली, विराट कोहलीने विकेट पडताच खोड काढली

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सामन्यात पुनरागमन करताना पंजाब किंग्सची कोंडी केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2024 11:15 PM2024-05-09T23:15:31+5:302024-05-09T23:16:37+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2024, PBKS vs RCB Live Marathi : Rilee Rossouw's fifty celebration, Virat Kohli's celebration on Rossouw's wicket, Video   | रायली रुसोने फिफ्टी मारून बॅट उंचावली, विराट कोहलीने विकेट पडताच खोड काढली

रायली रुसोने फिफ्टी मारून बॅट उंचावली, विराट कोहलीने विकेट पडताच खोड काढली

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2024, PBKS vs RCB Live Marathi : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सामन्यात पुनरागमन करताना पंजाब किंग्सची कोंडी केली आहे. रायली रुसो व जॉनी बेअरस्टो यांनी तुफान फटकेबाजी करून पंजाबला शर्यतीत ठेवले होते. पण, ल्युकी फर्ग्युसनने ही जोडी तोडली. रुसो २१ चेंडूत अर्धशतक झळकावून बंगळुरूचं टेंशन वाढवताना दिसला आणि अर्धशतकानंतर त्याने बॅट खांद्यावर ठेवून सेलिब्रेशन केले. मात्र, त्याची विकेट पडल्यानंतर विराट कोहलीने त्याची खोड काढली. 


पदार्पणवीर विद्वथ कावेरप्पाने RCB ला दोन धक्के दिले. कर्णधार फॅफ ड्यू प्लेसिस ( ९) आणि विल जॅक्स ( १२) यांना माघारी पाठवले. पॉवर प्लेमध्ये PBKS विराट व रजत यांची विकेट मिळाली असती, परंतु त्यांचे झेल सुटले. रजतने २३ चेंडूंत ३ चौकार व ६ षटकारांसह ५५ धावा करताना विराटसह ७६ धावा जोडल्या. विराट आणि ग्रीन यांनी ४२ चेंडूंत ९७ धावांची स्फोटक भागीदारी केली. विराट ४७ चेंडूंत ७ चौकार व ६ षटकारांसह ९२ धावांवर झेलबाद झाला. सेट झालेल्या ग्रीन व फिनिशर दिनेश कार्तिक  ( १८) १० चेंडूंत २७ धावा जोडल्या. ग्रीन २७ चेंडूंत ५ चौकार व १ षटकारासह ४६ धावांवर बाद झाला आणि बंगळुरूने ७ बाद २४१ धावा उभ्या केल्या. हर्षलने शेवटच्या षटकात तीन विकेट्स घेतल्या.  


RCB ने पहिले षटक फिरकीपटू स्वप्निल सिंगला देऊन मोठा डाव खेळला अन् प्रभसिमरन सिंग ( ६) पायचीत होऊन माघारी परतला. पण, रायली रुसो व जॉनी बेअरस्टो यांनी RCB ची डोकेदुखी वाढवली होती. दोघांनी ४.१ षटकांत संघाच्या पन्नास धावा पूर्ण केल्या. पॉवर प्लेच्या शेवटच्या षटकात ल्युकी फर्ग्युसनच्या स्लो चेंडूवर बेअरस्टोचा फटका चुकला अन् फॅफ ड्यू प्लेसिसने मिड ऑफवर उलट्या दिशेने पळून अप्रतिम झेल टिपला. बेअरस्टो १६ चेंडूंत ४ चौकार व १ षटकार खेचून २७ धावांवर बाद झाला आणि रुसोसह त्याची ६५ धावांची (३१ चेंडू) भागीदारी तुटली.  मात्र, रुसोने २१ चेंडूंत फिफ्टी पूर्ण करून लढा सुरूच ठेवला. पंजाबने ८.२ षटकांत शतकी पल्ला पार करून बंगळुरूवर दडपण निर्माण करण्यात यश मिळवले होते. कर्ण शर्माच्या ९व्या षटकात रुसोला माघारी जावे लागले. रुसो २७ चेंडूंत ९ चौकार व ३ षटकारासह ६१ धावांवर झेलबाद झाला.  १० षटकांत पंजाबच्या ३ बाद ११४ धावा झाल्या होत्या. 

इम्पॅक्ट प्लेअर जितेश शर्मा ( ५) याचाही कर्ण शर्माने त्रिफळा उडवला.  त्यानंतर स्वप्निल सिंगने पंजाबचा पाचवा फलंदाज माघारी पाठवला. लिएम लिव्हिंगस्टोन भोपळ्यावर बाद झाला.  


Web Title: IPL 2024, PBKS vs RCB Live Marathi : Rilee Rossouw's fifty celebration, Virat Kohli's celebration on Rossouw's wicket, Video  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.