कोरोना काळात EPFO ने केले मोठे बदल, PF खातेधारकांना मिळणार फायदा...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2020 17:47 IST2020-10-20T17:12:44+5:302020-10-20T17:47:08+5:30

कोरोना काळात कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) अनेक नियमांमध्ये बदल केले आहेत. तसेच, अशा अनेक व्यवस्था सुरू करण्यात आल्या आहेत, ज्या आता डिजिटल पद्धतीने आहेत. ईपीएफओच्या या नवीन प्रणालीचा फायदा पीएफ खातेधारकांना होण्याची शक्यता आहे.
ईपीएफओअंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांची विमा रक्कम 7 लाख रुपये करण्यात आली आहे. दरम्यान, कर्मचारी डिपॉझिट लिंक्ड विमा योजना (ईडीएलआय) एक विमा योजना आहे.
जी ईपीएफओ कर्मचार्यांना दिली जाते. सेवा कालावधी दरम्यान ईपीएफओच्या एखाद्या अॅक्टिव्ह कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या नॉमिनीला (वारसाला) सहा लाखापर्यंत रक्कम दिली जाते.
ईपीएफओने आपल्या भागधारकांच्या तक्रारींचे त्वरित निराकरण करण्यासाठी व्हॉट्सअॅप हेल्पलाइन सेवा सुरू केली आहे. या उपक्रमाद्वारे पीएफ भागधारक व्यक्तीगत स्तरावर ईपीएफओच्या क्षेत्रीय कार्यालयांशी थेट संवाद साधू शकतात.
आता ईपीएफओच्या सर्व 138 क्षेत्रीय कार्यालयांमध्ये व्हॉट्सअॅप हेल्पलाइन सेवा सुरू करण्यात आल्या आहेत. ईपीएफओच्या अधिकृत संकेतस्थळावर सर्व प्रादेशिक कार्यालयांचे व्हॉट्सअॅप हेल्पलाइन नंबर उपलब्ध आहेत.
ईपीएफओने ईपीएस सदस्यांना कर्मचारी निवृत्तीवेतन योजना 1995 अंतर्गत योजनेच्या प्रमाणपत्रात अर्ज करण्यास सक्षम केले आहे. अशा सदस्यांना योजनेचे प्रमाणपत्र दिले जाते, जे ईपीएफचे योगदान घेतात. मात्र सेवानिवृत्तीनंतर वयाच्या पेन्शनचा लाभ घेण्यासाठी ईपीएफओसह आपले सदस्यत्व टिकवून ठेवू इच्छितात.
एखादा सदस्य निवृत्तीवेतनास पात्र असेल तरच तो कर्मचारी निवृत्तीवेतन योजना,1995 चा कमीत कमी 10 वर्षांपर्यंत सदस्य असू शकतो.
नवीन नोकरी केल्यानंतर योजनेचे प्रमाणपत्र हे सुनिश्चित करते की, मागील पेन्शन योग्य सेवा नवीन नियोक्तासोबत प्रदान केलेल्या पेन्शन योग्य सेवेसह सेवा जोडल्या जातील. ज्यामुळे पेन्शनचे फायदे वाढतील.
कायदेशीर न्यायालयांप्रमाणेच कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्था (ईपीएफओ) सुद्धा व्हर्चुअल पद्धतीने ईपीएफ अंतर्गत येणाऱ्या अर्ध-न्यायिक प्रकरणांची सुनावणी करेल. यामुळे आस्थापने व ग्राहकांना वेळेवर उपाय उपलब्ध करुन देणे अपेक्षित आहे.