पैसा दुप्पट करण्याची मशीन बनली पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ ₹१००० पासून सुरू करू शकता गुंतवणूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2025 09:01 IST
1 / 7Post Office Investment Scheme: जर तुम्ही पैसे दुप्पट करणाऱ्या योजनेच्या शोधात असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी खूप खास आहे. या बातमीमध्ये तुम्हाला अशा एका योजनेबद्दल माहिती देत आहोत, जी तुमचे पैसे हमीपूर्वक दुप्पट (Guaranteed Double) करेल. 2 / 7सर्वात महत्त्वाचं म्हणजे, या योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांचे पैसे १०० टक्के सुरक्षित राहतात. तसंच यात तुम्ही कमीतकमी ₹१,००० पासून सहज गुंतवणूक सुरू करू शकता.3 / 7या सुरक्षित सरकारी योजनेचं नाव किसान विकास पत्र (KVP) आहे. ही योजना भारत सरकारद्वारे आणलेली एक लहान बचत योजना आहे, जी प्रामुख्याने पोस्ट ऑफिसमध्ये उघडली जाते. ही योजना सर्वप्रथम १९८८ मध्ये सुरू करण्यात आली होती आणि नंतर २०१४ मध्ये ती पुन्हा सुरू करण्यात आली.4 / 7या योजनेचा मुख्य उद्देश लोकांना दीर्घकालीन बचत आणि सुरक्षित गुंतवणुकीसाठी प्रोत्साहन देणं हा आहे. कोणताही भारतीय नागरिक देशभरातील पोस्ट ऑफिस आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमधून किसान विकास पत्र खरेदी करू शकतो.5 / 7किसान विकास पत्र योजना प्रत्येक भारतीय नागरिकासाठी उपलब्ध आहे. यामध्ये संयुक्त खातंही (Joint Account) उघडलं जाऊ शकतं, तसेच एकाच वेळी तीन लोक एकत्र खातं उघडू शकतात. याशिवाय, अल्पवयीन मुलांच्या नावावर देखील खातं उघडलं जाऊ शकतं, जे त्यांचे पालक किंवा कायदेशीर पालक चालवतात. संयुक्त खातंखालील दोन प्रकारांमध्ये उघडलं जाऊ शकतं.6 / 7जॉइंट A-: या प्रकारच्या खात्याचे संचालन करण्यासाठी सर्व खातेधारकांची संमती आणि स्वाक्षरी अनिवार्य असते. जर कोणत्याही खातेधारकाचा मृत्यू झाला, तर उर्वरित खातेधारक मिळून खातं चालवू शकतात.7 / 7जॉइंट B-: या प्रकारच्या खात्यात कोणत्याही एका खातेधारकाला खातं वापरण्याची परवानगी असते, म्हणजेच सर्व खातेधारकांचे एकत्र उपस्थित असणं आवश्यक नसतं. जर कोणत्याही एका खातेधारकाचा मृत्यू झाला, तर बाकी खातेधारक स्वतंत्रपणे खात्याचं कामकाज सुरू ठेवू शकतात.