Jio चा जबरा प्लॅन; 699 रुपयांमध्ये 100GB डेटा, Netflix-Amazon Prime सर्वकाही मोफत

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2023 08:29 PM2023-04-17T20:29:19+5:302023-04-17T20:32:44+5:30

Reliance Jio Postpaid Plans: तुम्हाला डेटा आणि कॉलिंगसह OTT Apps चा फायदा हवा असेल, तर हा प्लॅन तुमच्यासाठीच आहे.

Reliance Jio Postpaid Plans: मुकेश अंबानी यांची टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओकडे फक्त प्रीपेड ग्राहकांसाठीच नाही तर पोस्टपेड ग्राहकांसाठीही अनेक उत्तम प्लॅन्स आहेत.

आज आम्‍ही तुम्‍हाला अशाच एका प्‍लॅनबद्दल माहिती देणार आहोत, ज्यात तुम्‍हाला डेटा, कॉलिंग आणि एसएमएस सुविधेसह ओटीटीचा पूर्ण लाभ मिळणार आहे. जिओच्या या प्लॅनची ​​किंमत फक्त 699 रुपये आहे.

रिलायन्स जिओच्या या 699 रुपयांच्या पोस्टपेड प्लॅनमध्ये ग्राहकाला कंपनीकडून 100 जीबी हायस्पीड डेटा दिला जातो. डेटा व्यतिरिक्त तुम्हाला कोणत्याही नेटवर्कवर मोफत अमर्यादित व्हॉइस कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएसचा लाभ मिळेल.

महत्वाची गोष्ट म्हणजे, 100 GB डेटा संपल्यानंतर 10 रुपये प्रति जीबी खर्च येईल. इतकंच नाही तर 699 रुपयांच्या या प्लॅनमध्ये तुम्ही 3 अॅड ऑन फॅमिली सिमचा लाभही घेऊ शकता आणि प्रत्येक सिमसाठी एका महिन्यात अतिरिक्त 5 GB डेटा देखील दिला जाईल.

तुम्ही अॅड ऑन फॅमिली सिम खरेदी केल्यास तुम्हाला दरमहा 99 रुपये शुल्क आकारले जाईल. याशिवाय, अॅक्टिव्हेशनसाठी 99 रुपये प्रति सिम प्रोसेसिंग शुल्क आकारला जाईल.

डेटा, एसएमएस आणि कॉलिंग व्यतिरिक्त, रिलायन्स जिओच्या या प्लॅनसह, तुम्हाला नेटफ्लिक्सची मूलभूत सदस्यता आणि अॅमेझॉन प्राइममध्ये प्रवेश दिला जातो.

Amazon Prime Video चे सबस्क्रिप्शन तुम्हाला 1 वर्षासाठी दिले जाईल. जर तुमच्या भागात Jio ची 5G सेवा उपलब्ध असेल, तर तुम्ही या प्लॅनसह अमर्यादित 5G डेटाचा लाभ देखील घेऊ शकाल.