Jio ने लॉन्च केले नवीन 5G बूस्टर प्लॅन; फक्त 51 रुपयांत मिळेल अनलिमिटेड 5जी डेटा...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2024 07:25 PM2024-07-05T19:25:59+5:302024-07-05T19:29:45+5:30

Jio Data Booster: रिलायन्स Jio ने 3 नवीन 5G डेटा बूस्टर प्लॅन्स लॉन्च केले आहेत.

Jio 5G: रिलायन्स Jio ने आपल्या सर्व प्रीपेड आणि पोस्टपेड रिचार्ज प्लॅन्सच्या किमती वाढवल्या आहेत. याशिवाय, कंपनीने संकेत दिले होते की, ते 5G साठी वेगळे रिचार्ज प्लॅन लॉन्च करतील. आता मीडिया रिपोर्टनुसार, रिलायन्स जिओने तीन नवीन 5G डेटा बूस्टर प्लॅन लॉन्च केले आहेत.

जिओचे नवीन 5G प्लॅन-टेलिकॉम टॉकच्या रिपोर्टनुसार, रिलायन्स जिओने 3 नवीन 5G डेटा बूस्टर प्लॅन लॉन्च केले आहेत. या प्लॅनची ​​किंमत 51, 101 आणि 151 रुपये आहे. युजर्स त्यांच्या नियमित प्लॅन्ससह हे प्लॅन घेऊ शकतात.

51 रुपयांचा 5G डेटा बूस्टर प्लॅन-जिओच्या या 51 रुपयांच्या प्लॅन अंतर्गत युजरला अनलिमिटेड 5G डेटा आणि 3GB 4G डेटा मिळेल. ज्या युजर्सनी 1.5GB प्रतिदिन डेटा प्लॅन घेतलेला आहे, ते युजर 5G डेटा वापरण्यासाठी 51 रुपयांचा प्लॅन रिचार्ज करू शकतील. या प्लॅनची ​​वैधता चालू प्लॅन सारखीच असेल.

101 रुपयांचा 5G डेटा बूस्टर प्लॅन-या प्लॅन अंतर्गत युजरला अनलिमिटेड 5G डेटा आणि 6GB 4G डेटा मिळेल. ज्या युजर्सनी 1.5GB प्रतिदिन किंवा 1GB प्रतिदिन डेटा प्लॅन घेतलेला आहे, त्यांना 5G डेटा वापरण्यासाठी 101 रुपयांचा हा बूस्टर प्लॅन रिचार्ज करावा लागेल.

151 रुपयांचा 5G डेटा बूस्टर प्लॅन-या प्लॅनमध्ये युजरला अनलिमिटेड 5G डेटा आणि 9GB 4G डेटा मिळेल. ज्या युजर्सनी 1.5GB प्रतिदिन किंवा 1GB प्रतिदिन डेटा प्लॅन घेतलेला आहे, त्यांना 5G डेटा वापरण्यासाठी 151 रुपयांचा हा बूस्टर प्लॅन घ्यावा लागेल.