IRCTC देतंय 1,75,000 रुपये जिंकण्याची संधी, फक्त एक मिनिटाचा व्हिडिओ बनवावा लागेल
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2021 18:54 IST2021-07-27T18:43:32+5:302021-07-27T18:54:58+5:30
IRCTC : या स्पर्धेत भाग घेण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट आहे.

नवी दिल्ली : जर तुम्हालाही प्रवास करायला आवडत असेल तर तुमच्यासाठी आता एक चांगली बातमी आहे. IRCTC फिरणाऱ्या लोकांना एक लाख रुपयांचे बक्षीस देत आहे. हे एक लाख रुपये मिळविण्यासाठी आपल्याला फक्त एक व्हिडिओ बनवावा लागेल.
दरम्यान, Vlogers साठी IRCTC एक विशेष स्पर्धा आणली आहे, ज्याद्वारे आपल्याला हे बक्षीस मिळेल. या स्पर्धेत भाग घेण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट आहे. आयआरसीटीसी ही स्पर्धा CoRover च्या सहकार्याने आयोजित करीत आहे.
IRCTC ने ट्विटद्वारे याबाबत माहिती दिली आहे. IRCTC ने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर लिहिले आहे की, या स्पर्धेत भाग घेण्यासाठी व्लॉगर्सना भारतीय रेल्वे आणि तिकिट, कॅटरिंग, पर्यटन, हवाई, चॅटबॉट आणि पर्यटन स्थळांसारख्या अनेक विषयांवर व्हिडिओ बनवावे लागतील.
कसे करू शकता अर्ज?
या स्पर्धेत भाग घेण्यासाठी https://corover.ai/vlog/ या लिंकवर जाऊन स्पर्धक फॉर्म भरू शकतात.
कोणाला किती रुपयांचे मिळेल बक्षीस?
या स्पर्धेत प्रथम विजयी झालेल्या स्पर्धकाला एक लाख रुपयांचे बक्षीस तसेच प्रमाणपत्र व ट्रॉफी देखील देण्यात येणार आहे. दुसर्या क्रमांकाच्या स्पर्धकास 50000 रुपयांचे प्रमाणपत्र व ट्रॉफी आणि तृतीय क्रमांकाच्या विजेत्यास 25000 रुपयांचे प्रमाणपत्र व ट्रॉफी देण्यात येणार आहे. या व्यतिरिक्त इतर सर्व विजेत्यांना गिफ्ट कार्ड आणि 500 रुपयांचे प्रमाणपत्र दिले जाईल.
300 विजेत्यांची होईल घोषणा
या स्पर्धेअंतर्गत जवळपास 300 विजेत्यांची घोषणा केली जाईल. सर्व राज्यातील लोक या स्पर्धेत सहभागी होऊ शकतात. व्हिडिओची गुणवत्ता आणि सामग्री पाहिल्यानंतर विजेता घोषित केला जाईल.
IRCTC चे असेल कॉपीराइट
यामध्ये IRCTC CoRover सोबत मिळून आयआरसीटीसी आणि महाराजा व्हिडिओवर अपलोड करावे लागेल. यासह, एकदा व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर त्याचे आयआरसीटीसीद्वारे कॉपीराइट केले जाईल. त्यामध्ये निर्मात्याचे नाव दिले जाईल. तसेच, निर्माता या व्हिडिओसाठी क्लेम करू शकत नाही.
या विषयांवर बनवू शकता व्हिडिओ
आयआरसीटीसी टूरिझम, आयआरसीटीसी एअर, आयआरसीटीसी आयमुद्रा अॅप आणि वेबसाइट, आयआरसीटीसी ई-केटरिंग, आयआरसीटीसी एसबीआय कार्ड, आयआरसीटीसी नवीन ई-तिकीट वेबसाइट, आयआरसीटीसी बस बुकिंग, आयआरसीटीसी तेजस ट्रेन, रिटायरिंग रुमची बुकिंग यासारख्या विषयांवर व्हिडिओज तयार करून पाठवले जाऊ शकतात.