गुंतवणूकदारांची लागली लॉट्री! एकाच दिवसात ₹2000 ने वधारला हा शेअर, आता कंपनी देणार ₹205 चा डिव्हिडेंड!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2024 09:42 PM2024-02-13T21:42:20+5:302024-02-13T21:49:49+5:30

या कंपनीने मंगळवारी आर्थिक वर्ष 2023-24 साठी प्रति शेअर ₹205 चा अंतरिम डिव्हिडेंड देण्याची घोषणा केली आहे...

लार्ज कॅप कंपनी असलेल्या बॉश लिमिटेडने मंगळवारी आर्थिक वर्ष 2023-24 साठी प्रति शेअर ₹205 चा अंतरिम डिव्हिडेंड देण्याची घोषणा केली आहे. यासाठी 23 फेब्रुवारी 2024 ही रेकॉर्ड डेटही निश्चित करण्यात आली आहे. बॉश लिमिटेडचा शेअर आज बीएसईवर 8% अर्थात 1,969.85 रुपयांनी वधारून ₹27265 वर पोहोचला आहे.

हे शेअर सोमवारी 25295.15 रुपयांवर बंद झाला होता. आज मंगळवारी हा शेअर 52 आठवड्यांच्या नव्या उच्चांकावर पोहोचला आहे. या वर्षाच्या सुरुवातीपासून या शेअरमध्ये 20.36% ची वाढ झाली आहे. तसेच गेल्या एका वर्षात यात 55.06% ची वाढ झाली आहे.

कंपनीने एका रेग्युलेटरी फायलिंगमध्ये म्हटले आहे की, "आपल्या बोर्ड मेंबर्सनी आज आज झालेल्या बैठकीत आर्थिक वर्ष 2023-24 साठी प्रति शेअर ₹205 च्या अंतरिम डिविडेंडची घोषणा केली आहे. यासाठी शुक्रवार, 23 फेब्रुवारी, 2024 ही रेकॉर्ड डेट निश्चित करण्यात आली आहे. हा डिव्हिडेंड 6 मार्च, 2024 ला अथवा त्यानंतर दिला जाईल.”

या डिविडेंडची घोषणा करताना कंपनीने आपल्या तिसऱ्या तिमाहीचे निकालही घोषित केले आहेत. यात करानंतरचा एकत्रित निव्वळ नफा (PAT) 62.46% ने वाढून ₹518 कोटी झाला आहे. एका वर्षापूर्वीच्या याच कालावधीत तो ₹318.9 कोटी एवढा होता.

रेव्हेन्यूमध्येही 15% वाढ - बॉशचा रेव्हेन्यू 15% ने वाढून ₹4,205.2 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. तर गेल्या वर्षीच्या याच कालावधीत तो ₹3,659.9 कोटी एवढा होते.

व्याज, कर, घसारा आणि कर्जमाफी अथवा EBITDA च्या पूर्वीची कमाई 43% ने वाढून ₹578.4 कोटी झाली आहे. तर गेल्या वर्षीच्या याच कालावधीत ₹403.7 कोटी एवढी होती. मार्जिनचा विचार करता ते वार्षिक 11% च्या तुलनेत 13.8% राहिले.

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)