Investment: घरबसल्या मिळेल ५० हजार रुपये व्याज, अशी आहे योजना, अशी करता येईल गुंतवणूक

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2022 09:04 AM2022-04-25T09:04:06+5:302022-04-25T09:08:10+5:30

Investment: आपण केलेल्या गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळावा, असे प्रत्येकाला वाटत असते. तसेच निवृत्तीनंतर गुंतवलेल्या पैशामधून त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला अधिकाधिक लाभ मिळावा, असे त्यांना वाटत असते.

आपण केलेल्या गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळावा, असे प्रत्येकाला वाटत असते. तसेच निवृत्तीनंतर गुंतवलेल्या पैशामधून त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला अधिकाधिक लाभ मिळावा, असे त्यांना वाटत असते.

सध्या महागाईचा आलेख हा सतत वाढत चालला आहे. एका अंदाजानुसार निवृत्तीनंतर जर तुम्हाला दरमहा ५० हजार रुपयांची आवश्यकता असेल तर, लवकरात लवकर आपल्या कुटुंबातील कुठल्याही सदस्याच्या नावावर गुंतवणूक सुरू करा.

सध्या बँकांचे सरासरी वार्षिक व्याजदर पाच टक्के आहेत. हे दर त्यापेक्षा खाली जाण्याची शक्यता नाही. अशा परिस्थितीत दरमहा ५० हजार रुपये व्या मिळवण्यासाठी तुमच्याकडे १.२ कोटी एवढी रक्कम असणे आवश्यक आहे. त्यासाई तुम्हाला एसआयपीमध्ये गुंतवणूक करणे आवश्यक आहे.

उदाहरणार्थ आता तुमचे वय ३० वर्षे आहे. यावेळी तुम्ही दरमहा ३ हजार ५०० रुपये एसआयपी करणे सुरू करा. सध्याच्या काळात एसआयपीमध्ये तुम्हाला किमान १२ टक्के वार्षिक रिटर्न मिळण्याची अपेक्षा आहे.

२० वर्षांपर्यंत दरमहा ३ हजार ५०० रुपये जमा केल्यावर तुम्ही १२.६० लाख रुपये गुंतवणूक करता. त्यावर वार्षिक १२ टक्के सरासरी रिटर्न मिळते, त्यामुळे ३० वर्षे पूर्ण झाल्यावर १.२३ कोटी रुपयांचा फंड तयार होतो.

१.२३ कोटी रुपयांच्या फंडावर तुम्ही ५ टक्के वार्षिकच्या हिशोबाने व्याजाचं गणित केलं तर ते वार्षिक ६.१५ लाख रुपये होतात. त्यानुसार तुम्हाला ५० हजार रुपयांची कमाही सहजपणे मिळेल.

एसबीआय स्मॉल कॅप म्युच्युएल फंडाने गेल्या काही वर्षांमध्ये २०.०४ टक्क्यांचे रिटर्न दिले आहे. तर निप्पॉन इंडिया स्मॉल कॅप म्युच्युअल फंड स्कीमने १८.१४ टक्के आणि इंवेसको इंडिया मिडकॅप म्युच्युअल फंड स्किमने १६.५४ टक्के एवढं रिटर्न दिलं आहे.