डोंबिवली हादरली; एमआयडीसीतील रासायनिक कारखान्यातील रिॲक्टरचा स्फोट; २०१६ च्या आठवणी जाग्या

By अनिकेत घमंडी | Published: May 24, 2024 06:08 AM2024-05-24T06:08:39+5:302024-05-24T06:10:01+5:30

येथील सोनारपाडा परिसरात एमआयडीसीमध्ये अंबर (अमूदान) केमिकल ही कंपनी आहे. छताच्या पत्र्यांना दिला जाणाऱ्या रंगाची या कारखान्यात निर्मिती होते. या कारखान्यातील रिॲक्टरचा स्फोट झाल्यानंतर घटनास्थळी तातडीने मदतकार्य सुरू झाले. रात्री उशिरापर्यंत आग विझविण्याचे काम सुरू होते. 

Dombivli trembled; A reactor explosion at a chemical factory in MIDC; Remember the year 2016 | डोंबिवली हादरली; एमआयडीसीतील रासायनिक कारखान्यातील रिॲक्टरचा स्फोट; २०१६ च्या आठवणी जाग्या

डोंबिवली हादरली; एमआयडीसीतील रासायनिक कारखान्यातील रिॲक्टरचा स्फोट; २०१६ च्या आठवणी जाग्या

अनिकेत घमंडी/मुरलीधर भवार -

डोंबिवली : डोंबिवली शहर गुरुवारी दुपारी जबर स्फोटांच्या आवाजांनी हादरले. एमआयडीसीत रासायनिक कारखान्यातील रिॲक्टरचा स्फोट होऊन झालेल्या दुर्घटनेत आठजण ठार, तर ६० जण जखमी झाले. जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर  आहे. या दुर्घटनेमुळे २०१६ मध्ये याच परिसरात प्रोबेस या कंपनीत झालेल्या भीषण स्फोटांच्या कटु आठवणी जागृत झाल्या.

येथील सोनारपाडा परिसरात एमआयडीसीमध्ये अंबर (अमूदान) केमिकल ही कंपनी आहे. छताच्या पत्र्यांना दिला जाणाऱ्या रंगाची या कारखान्यात निर्मिती होते. या कारखान्यातील रिॲक्टरचा स्फोट झाल्यानंतर घटनास्थळी तातडीने मदतकार्य सुरू झाले. रात्री उशिरापर्यंत आग विझविण्याचे काम सुरू होते. 

अनेक इमारतींना हादरे; काचा फुटल्या
एमआयडीसीतील हा स्फोट एवढा शक्तिशाली होता की पाच किलोमीटरपर्यंत त्याचा आवाज ऐकू आला. तसेच स्फोटामुळे आसपासच्या आठ कारखान्यांना आगीच्या ज्वाळांनी लपेटले. परिसरातील निवासी इमारती, दुकाने, हॉटेल यांना भूकंप व्हावा तसे हादरे बसले. अनेक इमारतींच्या तर काचा फुटल्या. 

स्फोटानंतर कारखान्याला आग लागून धुराचे प्रचंड लोट अवकाशात पसरले. स्फोटाने भयभीत झालेल्या महिला, मुलांनी वाट मिळेल तिथे सुरक्षित ठिकाणी धाव घेतली. आगीचे लोळ, काळाकुट्ट धूर परिसरात पसरल्याने शहरभर भीती पसरली होती. एका मागोमाग एक तीन ते चार स्फोट झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

शाई कंपनीला आग, थिनरच्या ड्रमचे स्फोट -
नागपूर : हिंगणा एमआयडीसीतील वर्षा प्रिंटिंग इंक मॅन्युफॅक्चरिंग कंपनीला गुरुवारी सकाळी ६ वाजेच्या सुमारास भीषण आग लागली. 
यात कंपनीचे कार्यालय, कारखान्यातील मशिनरी आणि कच्चा माल 
जळून खाक झाला. या आगीत कंपनीत असलेल्या थिनरच्या ड्रमचे स्फोट झाल्यामुळे एमआयडीसी परिसरात खळबळ उडाली होती. सहा तासांनंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन पथकाला यश आले. 
शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
 

Web Title: Dombivli trembled; A reactor explosion at a chemical factory in MIDC; Remember the year 2016

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.