पत्नीसोबत Post Office च्या स्कीममध्ये करा गुंतवणूक; दर महिन्याला मिळेल ₹९००० चं फिक्स व्याज
By जयदीप दाभोळकर | Updated: July 3, 2025 08:54 IST2025-07-03T08:32:46+5:302025-07-03T08:54:29+5:30
Post Office Schemes:आरबीआयनं रेपो दरात कपात केल्यानंतर सर्व बँकांनी बचत खात्यांवरील व्याजातही कपात केली. मात्र, पोस्ट ऑफिसनं अद्याप आपल्या एकाही बचत खात्यावरील व्याजदरात कपात केलेली नाही.

Post Office Schemes: भारतीय रिझर्व्ह बँकेनं यंदा रेपो दरात १ टक्क्यांची कपात केली आहे. ही कपात ३ वेळा करण्यात आली आहे. आरबीआयनं आधी फेब्रुवारीमध्ये ०.२५ टक्के, एप्रिलमध्ये ०.२५ टक्के आणि नंतर जूनमध्ये ०.५० टक्के रेपो दरात कपात केली. आरबीआयनं रेपो दरात कपात केल्यानंतर सर्व बँकांनी बचत खात्यांवरील व्याजातही कपात केली.
मात्र, पोस्ट ऑफिसनं अद्याप आपल्या एकाही बचत खात्यावरील व्याजदरात कपात केलेली नाही. आज आम्ही तुम्हाला पोस्ट ऑफिसच्या एका अशा योजनेबद्दल सांगणार आहोत ज्यात तुम्ही तुमच्या पत्नीसोबत मिळून गुंतवणूक केल्यास तुम्हाला दरमहा ९००० रुपये फिक्स्ड व्याज मिळेल.
पोस्ट ऑफिस आपल्या ग्राहकांना विविध योजनांमध्ये पैसे गुंतविण्याचा पर्याय देते. पोस्ट ऑफिस एमआयएस अर्थात मंथली इनकम स्कीम देखील त्यापैकीच एक आहे. एसआयएस अंतर्गत तुम्हाला एकरकमी गुंतवणूक करावी लागते, ज्यावर तुम्हाला दरमहा थेट तुमच्या बचत खात्यात व्याज दिलं जातं.
पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीम ५ वर्षात मॅच्युअर होते, त्यानंतर तुमच्या गुंतवणुकीची संपूर्ण रक्कम तुमच्या खात्यात परत पाठवली जाते. या योजनेअंतर्गत एका खात्यात जास्तीत जास्त ९ लाख रुपये आणि संयुक्त खात्यात जास्तीत जास्त १५ लाख रुपये जमा करता येतात.
मासिक उत्पन्न योजनेत सध्या ७.४ टक्के वार्षिक व्याज मिळत आहे. या योजनेत तुमचे पैसे पूर्णपणे सुरक्षित असतात आणि तुम्हाला दरमहा हमीसह निश्चित व्याज मिळते. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे, या योजनेअंतर्गत, जास्तीत जास्त १५ वर्षांसाठी संयुक्त खात्यात पैसे जमा करता येतात.
जर तुम्ही या योजनेत तुमच्या पत्नीसोबत संयुक्त खात्यात १४,६०,००० रुपये जमा केले तर तुम्हाला दरमहा ९००३ रुपये निश्चित व्याज मिळेल, जे थेट तुमच्या पोस्ट ऑफिस बचत खात्यात जमा केलं जाईल.
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)